महाराष्ट्र, कर्नाटकात उडीद दराला मागणीचा आधार

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांत दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडदाला३००० ते ८००० रुपये या दरम्यान दर मिळाला, अशी माहिती जाणकारांनी दिली.
Demand base for urad rate in Maharashtra, Karnataka
Demand base for urad rate in Maharashtra, Karnataka

पुणे : चालू सप्ताहात उडदाला मागणी चांगली राहिल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांत दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडदाला ३००० ते ८००० रुपये या दरम्यान दर मिळाला, अशी माहिती जाणकारांनी दिली.

बऱ्याच भागांत उडदाची पीककाढणी झाली असली तरी अनेक भागांत उडदाच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यातच उडीद उत्पादक राज्यांत महत्त्वाच्या पट्ट्यांत जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे. परिणामी, मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात बाजारात आवक होणाऱ्या उडदामध्ये डागी माल किंवा कमी गुणवत्तेचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. तसेच उडदाची मागणीही वाढत आहे. दिल्ली बाजारात उडदाच्या दरात २५ ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात उडदाचे दर ६१०० ते ७२०० रुपयांदरम्यान होते. राजस्थानमधील बाजार समित्यांत चालू सप्ताहात उडदाच्या दरात तेजी-मंदीचा अभाव होता. जयपूर बाजारात उडदाचे दर प्रतिक्विंटल ६८०० ते ७४०० रुपयांदरम्यान राहिले. तर केकडी बाजार समितीत उदाची दैनंदिन आवक १००० ते १५०० पोत्यांच्या दरम्यान राहिले. तर दर ५८०० ते ८००० रुपयांदरम्यान राहिले. 

कर्नाटकात मागणी अधिक गेल्या सप्ताहात उडदाला कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील बाजारांत चांगली मागणी राहिली. कर्नाटकात आठवडाभरात उडदाच्या दरात प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. येथील गुलबर्गा बाजार समितीत उडदाला ४००० ते ७१०० रुपये दर मिळाला. तर हुबळी येथे ५९९१ ते ६८१९ रुपये, बीदर बाजार समितीत ३००० ते ७१०० रुपये दर मिळाला.

राज्यात पिकाला फटका महाराष्ट्रात उडीद पीककाढणीच्या काळात झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. अनेक भागांत पिकाचा दर्जा खालावला आहे. चांगल्या उडदाला डाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणी वाढत असल्याने गेल्या सप्ताहात दरात १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. या उडदाचे दर बार्शी बाजारात ४००० ते ७२०० रुपये यादरम्यान होते. दुधनी येथे ५००० ते ७५०० रुपये, नगर येथे ४२०० ते ७२०० रुपये, जळगाव बाजार समितीत ५०५० ते ७४०० रुपये आणि लातूर बाजारात समितीत ४६०० ते ७२०० रुपयांदरम्यान उडदाला दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com