agriculture news in Marathi demand of chicken increased Maharashtra | Agrowon

चिकनच्या मागणीत हलकी वाढ; दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

गेल्या बुधवारपासून किरकोळ विक्री हळूहळू वाढत गेली. जे ग्राहक कमी झाले होते, त्यांच्यात पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत सकारात्मक मागणी वाढली. नाशिक, पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढती असल्याने आशादायी चित्र आहे. 
- श्रीकृष्ण गांगुर्डे, एव्ही ब्रॉयलर्स, नाशिक 

नाशिक : चिकन व कोरोनाचा थेट संबंध नसताना गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावरील अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत या व्यवसायाचे कोटींचे नुकसान झाले असतानाच, चिकनच्या मागणीत हळूहळू वाढ होत असून, दरातही हलकी सुधारणा झाली आहे. 

रविवारच्या (ता. २२) जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. २१) चिकनच्या मागणीत आणि दरात वाढ हलकी सुधारणा झाल्याची माहिती पोल्ट्री उद्योगातील सूत्रांनी दिली. 

ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, महिन्यात साडेचार कोटी ब्रॉयलर कोंबडी उत्पादन, तर नाशिक जिल्ह्यात महिन्याला दीड कोटी कोंबड्यांचे उत्पादन होते. मात्र कोरोनाच्या अफवांमुळे मागणी घटल्याने मोठ्या नुकसानीला या उद्योगाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात या उद्योगातील अर्थकारण कोलमडले आहे.

अशातच शनिवार (ता. २१) चिकन विक्री केंद्रावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे मागणीत वाढ झाल्याचे सकारात्मक परिस्थिती या उद्योगासाठी तयार होत आहे. तसेच ग्राहकांच्या मनातील चिकन व कोरोनाबाबतचा संभ्रम कमी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आहारात चिकन घेण्याबाबत भीती कमी होऊन उठाव झाल्याचे पाहायला मिळाले. 

गेल्या दीड महिन्यात मागणी नसल्याने चिकन प्रतिकिलो कमीत कमी ३ रुपये दराने किलोपर्यंत नीचांकी विक्री झाली. त्यामुळे बाजारात मागणी वाढल्याने जिवंत पक्षी सध्या 
२५ ते ३० रुपयांपर्यंत दराने विक्री झाली, थेट चिकन विक्री प्रतिकिलो ३० ते ४५ रुपयांपर्यंत, तर काही ठिकाणी ६५ रुपयांपर्यंत विक्री झाली.

त्यामुळे आजही उत्पादन खर्चाच्या तुलनेत सर्वसाधारण ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी मागणी मंदावल्याने विक्रीयोग्य तयार कोंबड्या मोठ्या प्रमाणावर शेडमध्ये पडून होत्या. त्यापैकी संभ्रम कमी झाल्याने ४० टक्के खपला आहे, उर्वरित ६० टक्के माल अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अशीच मागणी कायम राहिल्यास उर्वरित मालाचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे. पुढील काळात शासनाने अत्यावश्यक बाबीत चिकन, अंडी विक्रीसाठी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

सध्य विक्री व दर स्थिती : 
प्रतिपक्षी प्रतिकिलोसाठी उत्पादन खर्च :
७५ रुपये 
झालेला जिवंत पक्षी दर प्रतिकिलो (ता. २१ रोजी) : २५ ते ३० 
चिकन विक्री दर : ३० ते ४५ रुपये 

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...