Agriculture news in marathi Demand for construction of saline dam | Agrowon

खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 एप्रिल 2021

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावकोंडवाडी परिसरातील भागात खारे पाणी घुसत असल्यामुळे पन्नास एकर परिसरातील भातशेतीची जमीन नापिक बनली आहे.

पावस, जि. रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावकोंडवाडी परिसरातील भागात खारे पाणी घुसत असल्यामुळे पन्नास एकर परिसरातील भातशेतीची जमीन नापिक बनली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, तातडीने खारभूमी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संस्थेच्या सभासदांनी केली आहे. 

रत्नागिरी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या गावखडी या गावाला खाडीने वेढलेले आहे. त्यामुळे खाडीकिनारी गाव वसलेले असून, यातील गावकोंडवाडी व राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रूक या भागाला जोडणारा खारलँड बंधारा गेल्या अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यामुळे या भागातील अनेक जमिनी सुपीक होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळात कशेळी गावातील ग्रामस्थांनी हा खारलँड बंधारा फोडला होता. त्यामुळे भातशेती बरोबर अनेक दुबार पिके घेत येणारी जमीन खारपड झाली आहे.

कशेळी गावातील ग्रामस्थांना या बंधाऱ्यामुळे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वारंवार त्या बंधाऱ्याची झडपा तोडण्यात आली होती. गावखडीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार झडपा बसवण्यात येत होती. परंतु पुन्हा ती फोडली जायची. खारे पाणी मोठ्या प्रमाणात गावकोंडवाडी परिसरात घुसत असल्यामुळे गेली अनेक वर्षे या परिसरातील सुमारे पन्नास एकर जागा नापिक बनली आहे. 

या पूर्वी या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री देव जगन्नाथ खारभूमी लाभार्थी सहकारी संस्था मर्यादित या नावाने सोसायटीची स्थापना केली होती. अनेक शेतकरी या परिसरात भातशेती, वरणा, पावटा, भाजीपाला आदी पिके घेत होते. या सोसायटीच्या माध्यमातून येथील शेतकरी त्या जागेच्या खारभूमी खात्याला दस्तही भरत आहेत.

या परिसरात घुसणारे खारे पाणी थांबविण्याकरिता खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी केली जात आहे. सुमारे ६० कुटुंबांवर जमिनी भातशेती व इतर दुबार पिके घेण्यास नापिक बनल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या खारभूमी खात्याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. या करिता गावखडी-आडिवरे पंचक्रोशी तिलोरी कुणबी समाजाचे सल्लागार रामचंद्र जुवळे, जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत व बंदरविकास मंत्री असलम शेख यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या ठिकाणी खारभूमी बंधारा बांधण्याकरिता पाठपुरावा करणार 
असल्याचे सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...