agriculture news in Marathi demand for control on milk sell commission Maharashtra | Agrowon

दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपयांपेक्षा कमी दर मिळणार नाही यासाठी सरकारनेच काळजी घ्यावी.

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपयांपेक्षा कमी दर मिळणार नाही यासाठी सरकारनेच काळजी घ्यावी. त्यासाठी दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणावे, अशी एकमुखी सूचना राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने केली आहे. 

डेअरी उद्योगाच्या समस्या विचारात घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व तत्कालीन दुग्धविकासमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ही समिती आकाराला आली आहे. शासकीय यंत्रणेने गेल्या वर्षी ही समिती घोषित केली; मात्र बैठक या समितीची घेतली गेली नव्हती. 

‘महानंद’मध्ये अखेर बुधवारी (ता. २४) राज्याचे दुग्धविकास आयुक्त हनुमंत तुमोड यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पहिली बैठक झाली. या वेळी डेअरी उद्योगातून शेतकऱ्यांना दुधाचे भाव कमी होणार नाही यासाठी उपाय करण्याबाबत सूचना आल्या. 

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली. राज्यात दूध विपणन मंडळ स्थापन करावे, पशुखाद्याचे दर नियंत्रित करावे तसेच दूध वापरासाठी शासनाचे प्रसार मोहीम राबविण्याची मागणी संघाने केली. राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी, ‘‘दूध उत्पादन वाढ करतानाच उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी खासगी व सरकारी क्षेत्राने समन्वय काम करावे,’’ असे सुचविले. 

भुकटीचे शासकीय प्रकल्प बंद 
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये दूध उत्पादन सतत वाढते आहे. सध्या ११९ सहकारी व ४६७ खासगी दुग्धशाळा राज्यात आहे. त्या तुलनेत दूध भुकटी प्रकल्पांची संख्या केवळ ३५ आहे. यात भुकटीचे तीनही सरकारी प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. सहकारातील आठ पैकी सात मात्र चालू आहेत. उर्वरित २४ प्रकल्प खासगी संस्थांकडून चालविले जात आहेत. तसेच शिल्लक असलेल्या २५ हजार टन भुकटीचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. 

या वेळी चर्चेत चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे, पराग मिल्कचे प्रीतम शहा, औरंगाबाद दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राजारामबापू दूध विनायकराव पाटील, ऊर्जा दुधाचे प्रकाश कुतवळ, सोनई डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, एनडीडीबीचे विभागीय व्यवस्थापक अनिल हातेकर, सहायक दुग्धविकास आयुक्त श्रीकांत शिप्पूरकर यांनी भाग घेतला. 

समितीने अशा केल्या सूचना 

  • दुधाचे दर २५ रुपयांपेक्षा कमी नकोत 
  • भुकटी व लोण्याचे दर कमी होताच भुकटी उत्पादक व पाऊच पॅकिंग प्रकल्पांना अनुदान द्यावे. 
  • दूध विक्रीतील कमिशनची स्पर्धा नियंत्रित करावी 
  • दूध उत्पादन खर्चाचा ताळेबंद काढून आढावा घ्यावा 
  • सल्लागार समितीची बैठक दोन महिन्यांतून घ्यावी 

इतर अॅग्रो विशेष
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...