Agriculture news in Marathi Demand for cotton has soared this year | Page 2 ||| Agrowon

मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळी

वृत्तसेवा
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि कुमकुवत पुरवठा असल्याने देशांतर्गत कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सीसीआयला खरेदी करण्याची गरज पडणार नाही.

पुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि कुमकुवत पुरवठा असल्याने देशांतर्गत कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सीसीआयला खरेदी करण्याची गरज पडणार नाही. बाजारात कापसाचे दर ७००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास शेतकरी माल रोखून धरतील. मागणी जास्त असल्याने सूतगिरण्या आक्रमक खरेदी करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही कापूस यंदा भाव खाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विचारपूर्वक विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये केले. 

सरकारने २०२१-२२ च्या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसासाठी ६०२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. 

सीसीआयचे अध्यक्ष प्रदीप अगरवाल म्हणाले, की सध्या कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) यंदा बाजारात हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. कापूस हंगाम २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ‘सीसीआय’ने एकूण ५५ हजार कोटींचा २ कोटी ७ लाख कापूस गाठी खरेदी केला. सध्या कापसाचे दर हे हमीभावापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक आहेत. त्यामुळे बाजारात सीसीआयला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. २०२१-२२ च्या हंगामात देशात ३५५ ते ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगातही ३५५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा लागवड क्षेत्र १३३ लाख हेक्टरवरून यंदा १२५ लाख हेक्टरवर आले आहे. 

लुईस ड्रेफस कंपनीचे कापूस महाव्यवस्थापक सुमीत मित्तल म्हणाले, की अमेरिकेकडे यंदा कापसाचा शिल्लक साठा कमी असल्याने इंटरनॅशनल कॉटन एक्स्चेंजवर कापसाचे दर वाढलेले आहेत. तसेच जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांत उत्पादनाची स्थिती मजबूत नाही. त्यामुळे २०२१-२२ च्या हंगामात कापसाची वाटचाल आशादायक असेल.

व्यावसायिक धीरज खेतान म्हणाले, की चांगले मार्जिन राहत असल्याने कापसाला सूतगिरण्यांकडून देशांतर्गत चांगली मागणी असून, निर्यातीसाठी मागणी आहे. देशांतर्गत दर वाढलेले असतानाही मागणी असल्याने सूतगिरण्या मोठी खरेदी करत आहे. तसेच पुरवठ्यापेक्षा वापर जास्त वाढला आहे. 

डीडी कॉटनचे संचालक अरुण सेखसारिया म्हणाले, की नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बाजारात दैनंदिन सरासरी दोन लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक वाढल्यास देशातील काही भागांत सीसीआयला खरेदीसाठी उतरावे लागेल.

सात हजारांपेक्षा कमी दरात शेतकरी विक्री करणार नाहीत
महेश सारडा म्हणाले, की यंदा कापूस बाजाराला मागणीचा मजबूत आधार आहे. बाजारात कापसाचे दर हे ७००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास शेतकरी कापूस विकणार नाहीत. सूतगिरण्यांना चांगला नफा होत असल्यास अशीच खरेदी आणखी जास्त काळ होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कापसाला चांगली मागणी आहे. सीसीआयला तेलंगणा वगळता इतर ठिकाणी कापूस खरेदी करावी लागणार नाही, असे मला वाटते.


इतर अॅग्रोमनी
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...