महापूरबाधित ऊस तोडीस प्राधान्य देण्याची शेतकऱ्यांची मागणी

निवेदन देताना शेतकरी
निवेदन देताना शेतकरी

तांबवे, जि. सातारा   ः कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांना आलेल्या महापुरात ऊस मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. तो ऊस प्राधान्याने तोडावा, अशी मागणी सुपने येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.   

निवेदनातील माहिती अशी, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील कृष्णा, कोयना तसेच अन्य लहान-मोठ्या सर्व नद्यांना अभूतपूर्व असा महापूर आला. महापुरात नदीकाठच्या हजारो हेक्‍टर ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, एक आठवडा ऊस पाण्यात राहिल्याने उसाचे मोठे नुकसान झाले आहे. हा ऊस जनावरांना चारा म्हणूनसुद्धा वापरण्यायोग्य राहिलेला नाही. जिल्ह्यातील साखर कारखाने आता सुरू होत आहेत. शेतकऱ्यांच्या बाधित ऊस क्षेत्राचे बहुतांश पंचनामे झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. हा ऊस कारखान्यांनी लवकर तोडून गळितास नेल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. स

र्व कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पूरबाधित ऊस नोंद असो अगर नसो, हा ऊस लवकर तोडून नेणे गरजेचे आहे. कारखान्यांनी फायदा- तोट्याचा विचार न करता महापूर, अतिवृष्टी व ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. प्रशासनाने तसे आदेश कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदव्दारे सुपन्यातील शिवाजी पाटील, दिलीप पाटील, राहुल पाटील, प्रदीप पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com