कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी

कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी

धुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे. कांद्याची लागवड, आवक नाशिक, नगर भागात कमी झाले, तरीही खानदेशात कांद्याचे दर वाढत नाहीत. त्यामुळे हमीभाव मिळावा, अशी मागणी धुळे, चोपडा (जि. जळगाव) भागातील शेतकऱ्यांनी केली.

धुळे जिल्ह्यात शिंदखेडातील चिचवार, टाकरखेडा परिसरात, धुळ्यात कापडणे, कौठळ, न्याहळोद, जापी, तामसवाडी, धनूर, कुसुंबा, नेर भागात कांदा लागवड बऱ्यांपैकी आहे. त्यामुळे कांदाचाळींची संख्याही वाढत आहे. शेतकरी तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड, साठवणूक करीत आहेत. काही शेतकरी बिजोत्पादन करतात. नंदुरबारात नवापूर, शहादा भागात बीजोत्पादन, कांदा उत्पादन घेतले जाते. चोपडा, यावल या भागातील शेतकरी तीन हंगामात कांदा उत्पादन घेतात. परंतु  दर ३५० रुपये, ६०० रुपये असतात. कांदा दराबाबत मागील दोन वर्षे मोठी अस्थिरता राहिल्याने शेतकऱ्यांना फटका बसला, असे उत्पादक किरणसिंग पाटील (चोपडा) म्हणाले.

कांद्याला हमीभाव देऊन तो चार महिन्यात निश्‍चित करावा. हमीभाव शेतकरी, बाजार समित्या व व्यापाऱ्यांनी ठरवावा. त्याची १०० टक्के अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे नुकसान कमी करावे. सद्यःस्थिती लक्षात घेऊन किमान १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कांद्याला मिळावा, अशी मागणी कापडणे, न्याहळोद भागातील शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com