Agriculture news in Marathi Demand for dried fruits increased | Page 2 ||| Agrowon

पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही मसाल्याचे पदार्थ तसेच सुकामेव्याला मागणी वाढली आहे. काजू, बादाम, पिस्ता आणि चारोळीला या काळात जास्त मागणी असते.

पुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही मसाल्याचे पदार्थ तसेच सुकामेव्याला मागणी वाढली आहे. काजू, बादाम, पिस्ता आणि चारोळीला या काळात जास्त मागणी असते. देशातील अग्रगण्य अशा इंदूर येथील बाजारात काजू ७५० ते ११७५ रुपये प्रतिकिलो, पिस्ता १८५० ते १९०० रुपये, बादाम ७०० ते ७५० रुपये आणि चारोळीचे दर ११५० ते १२०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. तर बेदाण्याला १७० ते २४० रुपये दर मिळत आहेत. नंतर लगेच नवरात्री असल्याने दर टिकून राहण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

पितृपक्षात काही मसाल्याच्या पदार्थांनाही मागणी वाढली आहे. चारोळीची उपलब्धता कमी असल्याने दरात तेजी आहे. सध्या ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. बादाम दरात गेल्या काही दिवसांपासून नरमाई होती. परंतु आता मागणी वाढल्याने दरातही काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पितृपक्ष सुरू झाल्यापासून बादामच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काजूच्या दरातही काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. तर बेदाणाचे दर टिकून आहेत.

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीचा उत्सव आहे. नवरात्रीतही सुकामेव्याला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी नवरात्रीतही या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यानंतर लगेच दिवाळी असल्याने पुढील दोन महिने मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आसपास सुकामेव्याची उलाढाल जास्त वाढलेली असते. जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्या अक्रोड पिकाची आवक सुरू झाली आहे. पोषक वातावरण असल्याने यंदा जास्त उत्पादन होण्याची शक्यता आहे. येथे सेंद्रिय अक्रोडचेही उत्पादन होते. या अक्रोडला देशांतर्गत जास्त मागणी आहे. सणांबरोबरच हॉटेल्स आणि रेस्टॅरेंट्स मोठ्या प्रमाणावर सुरू होत असून, सुकामेव्याला मागणी वाढत आहेत. येणाऱ्या काळात यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

यंदा चांगल्या दराची अपेक्षा
तब्बल दीड वर्षानंतर कोरोनाची स्थिती सणांच्या काळात पूर्वपदावर आहे. काही भागांत भीती अद्यापही कायम आहे. मात्र उत्तर भारतात सुकामेव्याचा व्यापार जोरात सुरू आहे. देशांतर्गत उद्योगाकडे काजू उपलब्ध असून दरही समाधानकारक आहेत.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...