agriculture news in marathi, Demand for drought and pavement for farmers in Loha, kandhar : NCP Youth Congress demand | Agrowon

लोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, पीकविमा द्या : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत सध्या भीषण दुष्काळी परस्थिती आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पादन मिळाले नाही. शेतीमालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाला. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीकविमा परतावा, दुष्काळी मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस दिलीप धोंडगे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत सध्या भीषण दुष्काळी परस्थिती आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पादन मिळाले नाही. शेतीमालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाला. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीकविमा परतावा, दुष्काळी मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस दिलीप धोंडगे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

मागील वर्षीचा पीकविमा तत्काळ मंजूर करावा, दुष्काळी अनुदानासह शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती तत्काळ कमी कराव्यात, लिंबोटी धरणातून उदगीर आणि पालम शहरांसाठी पाणीपुरवठा करू नये, लोहा कंधार तालुक्यातील कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

लोहाचे राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष संजय पाटील-कऱ्हाळे, जिल्हा कार्यध्यक्ष दत्ता पाटील, शिवदास धर्मापुरीकर, मनोहर पाटील- भोसीकर, बाबूराव केंद्रे, शिवराज पाटील-पवार, बाबासाहेब देशमुख, जि. प. सदस्य ॲड. विजय धोंडगे, राजकुमार केकाटे, दत्ता कारामुंगे, अच्युत मेटकर आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...