खावटी कर्ज माफ करण्याची किसान काँग्रेसची मागणी

खावटी कर्ज माफ करण्याची किसान काँग्रेसची मागणी
खावटी कर्ज माफ करण्याची किसान काँग्रेसची मागणी

कोल्हापूर : पीककर्जाच्या धर्तीवर खावटी कर्जे सरसकट माफ करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ३०) आंदोलन केले.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बँकामार्फत दिलेल्या खावटी कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्याचा निर्णय झाला आहे. पण विकास सोसायटी मार्फत वाटप झालेल्या खावटी कर्जाचा समावेश केलेला नाही. त्याचा विकास सोसायटीकडील थकबाकीदार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जिल्हा बँक ज्या वेळेस पीककर्ज वितरित करतात. त्यामध्ये खावटी कर्जाचा समावेश नसते. पीक कर्जाशिवाय खावटी कर्ज वितरित करावयाचे आहे. अशा बँका पोटनियमात तशी तरतूद करून घेतात. त्यांना लाभ मिळतो, पण सांगली जिल्हा बँकेसह बहुसंख्य जिल्हा बँकांनी खावटी कर्जवाटपासंदर्भात पोटनियम दुरुस्ती केलेली नाही.’’ 

तसेच अनेक सोसायट्यांनी स्वभांडवलातून खावटी कर्जवाटप केले आहे. त्यांच्या थकीत खावटी कर्जाला माफी मिळणे गरजेचे आहे. पीककर्जाच्या धर्तीवर खावटी कर्ज सरसकट कर्जमाफी द्यावी. पंजाबराव देशमुख व्याज रावलत योजना ३० जून अखेर परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू होते. त्याचप्रमाणे कर्जमाफी धोरणात बदल करण्यात यावा, कारण अजूनही जवळजवळ ३० ते ३५ टक्के शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. खावटी कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना देता ती सरसकट कर्जमाफी करावी. त्यामुळे परत फेड करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल. शेत, घर, गोठा है अनुषंगिक कर्ज असूनही त्याचा कर्जमाफी योजनेत समावेश नाही. तो करण्यात यावा. ३० जून २०१६ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीदार योजनेचा लाभ देण्यात आला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली थकबाकी ता. ३१ जुलै २०१७ पूर्वी परत फेड केली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कम ही मिळाली नाही. ती देण्यात यावी.’’ 

या वेळी रणजित पाटील, संपतराव पाटील, शिवराजसिंह आदींसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com