शिरपूर : अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करा : शेतकऱ्यांची मागणी

शिरपूर : अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करा : शेतकऱ्यांची मागणी
शिरपूर : अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करा : शेतकऱ्यांची मागणी

शिरपूर जैन, जि. वाशीम ः या परिसरात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची सुरू असलेली कामे अद्यापही अपूर्ण आहेत. सहा महिन्यांपूर्वीच काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आलेले आहेत. तरी रस्ते लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे. शिरपूर परिसरात मागील वर्षीपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काही रस्त्याचे कामे सुरू करण्यात आले होते. यामध्ये शिरपूर ते शेलगाव खवणे या रस्त्याचे खडीकरण करून डांबराचा पहिला स्तर टाकण्यात आला. मात्र, डांबराचा दुसरा स्तर अद्यापही टाकण्यात आलेला नाही. तसेच, शिरपूर ते भेरा या रस्त्यावर केवळ खोदकाम करून मातीचा भरणा करण्यात आलेला आहे. यामुळे जुन्या रस्त्याची गिट्टी उघडी पडल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना ते त्रासाचे ठरत आहे. अद्यापही अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी तथा नागरिक आशिष देशमुख, संतोष भालेराव, कैलास गाडे आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com