शेततळे अस्तरीकरणासाठी मागणी वाढली
शेततळे अस्तरीकरणासाठी मागणी वाढली

पुणे जिल्ह्यात शेततळे अस्तरीकरणासाठी मागणी वाढली

पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकरी पिकांसाठी शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध करत आहे. त्यासाठी शेतकरी शेततळे उभारणी करत असून त्यासाठी आवश्यक असलेले अस्तरीकरण आवश्यक आहे. यंदा या अस्तरीकरणासाठी अनुदान मिळण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे पुणे जिल्ह्यातून तब्बल १५५८ अर्ज दाखल झाले असून १५४९ अर्ज पात्र ठरविले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकरी पाणीटंचाईअभावी फळबागाकडे वळला आहे. फळबागेसाठी उन्हाळ्यात शाश्वत पाण्याची सोय व्हावी, म्हणून शेतकरी शेतात शेततळे उभारणी करत आहे. त्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. एनएचएमअंतर्गत सामूहिक शेततळे तर कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजना मागील काही वर्षांपासून मोठ्या स्वरूपात राबविण्यात येत आहे. त्यासाठी अनुदानही उपलब्ध करून देण्यात येते.

या अनुदानामुळे चार हजारांहून अधिक शेततळे जिल्ह्यात झाले आहेत. त्यामुळे पाणीसाठा होऊन फळबागेतून शाश्वत उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना मदत झाली. गेल्या वर्षापासून कमी पावसामुळे शेततळ्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. मात्र, शेततळे घेतल्यानंतर पाणी साठविण्यासाठी प्लॅस्टिक अस्तरीकरण खूप आवश्यक आहे.

त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी खर्चाच्या ५० टक्केपर्यंत आकारामानानुसार कमीत कमी २८ हजार २७५ ते जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांपर्यत अनुदान देण्यात येते. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने आॅगस्ट महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची लाॅटरी पद्धतीने निवड केली असून लवकरच निवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

शेततळे अस्तरीकरणासाठी उपविभागनिहाय आलेले अर्ज
उपविभाग नोंदणी अर्जपात्र अर्ज
बारामती ११२९ ११२१
खेड ३७१ ३७०१
पुणे ५८ ५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com