Agriculture news in marathi Demand for fertilizers declined in Khandesh | Agrowon

खानदेशात खतांची मागणी घटली

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार कमी झाली आहे. पावसाचा अभाव व वाढता खर्च या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांना खते देणे टाळले आहे. परिणामी, खतांची मागणी घटली आहे.

जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार कमी झाली आहे. पावसाचा अभाव व वाढता खर्च या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांना खते देणे टाळले आहे. परिणामी, खतांची मागणी घटली आहे.

नंदुरबार, धुळे व जळगावात युरिया, १०.२६.२६, दाणेदार सुपर फॉस्फेटची मोठी टंचाई मागील दोन ते अडीच महिने होती. सद्यःस्थितीतही युरियाचा पुरवठा कमी आहे. परंतु, पूर्वहंगामी कापूस, केळी, ऊस व तृणधान्याचे अधिक उत्पादन, लागवड असलेल्या भागात मागील १० ते ११ दिवसांपासून पाऊस नाही. खते पावसाळी वातावरण (थंड) किंवा तुरळक पाऊस सुरू असताना अनेक शेतकरी पिकांना देत असतात. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, ताग या पिकांना दुसऱ्यांदा रासायनिक खते देण्याचे नियोजन केले होते. परंतु, पावसाने दडी मारली. ऊन तापत आहे. उष्णता प्रचंड व पाऊस नसल्याने खतांवरचा खर्च वाया जाईल, या भितीने शेतकरी खते देत नसल्याचे चित्र आहे. 

जळगाव, धुळे व नंदुरबारमधील खतांच्या दुकानांसमोरील रांगांची स्थिती दूर झाली आहे. नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या भागातही पाऊस नाही. या भागात खतांची मागणी ऑगस्टमध्येही अधिक असते. जूनमध्ये या भागात खतटंचाई अधिक जाणवत होती.

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर आदी भागात रोज युरिया व इतर संयुक्त खतांची सुमारे १० ते ११ टन मागणी असायची. परंतु, या भागातील मागणी १० टक्क्यांवर आली आहे. अशीच स्थिती नंदुरबार जिल्ह्यातही आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे या भागात खतांची उचल आहे. परंतु, तेथेही पाऊस कमी आहे, असे सांगण्यात आले.

पाऊस नाही. पिकांची अवस्था बिकट होत आहे. खतांची खरेदी शेतकरी करीत नाहीत. कारण, हा खर्च वाया जाण्याची भीती आहे.
- रमेश पाटील, शेतकरी, आडगाव (जि.जळगाव)


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...