परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढली

परभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत विविध ग्रेडचा मिळून २५ हजार १७९ टन एवढा खतसाठा शिल्लक होता. जमीन वाफशावर नसल्यामुळे यंदा रब्बी पेरण्यांना विलंबाने सुरवात झाली आहे. खतांची मागणी वाढली आहे. पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
Demand for fertilizers increased in Parbhani district
Demand for fertilizers increased in Parbhani district

परभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत विविध ग्रेडचा मिळून २५ हजार १७९ टन एवढा खतसाठा शिल्लक होता. जमीन वाफशावर नसल्यामुळे यंदा रब्बी पेरण्यांना विलंबाने सुरवात झाली आहे. खतांची मागणी वाढली आहे. पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी अॉक्टोबर ते मार्च कालावधीत विविध ग्रेडचा ६० हजार ४३० टन खतसाठा मंजूर झाला आहे. त्यात युरिया २० हजार ७७० टन, सिंगल सुपर फॉस्फेट १० हजार २७० टन, पोटॅश १ हजार ९९० टन,  डीएपी ७ हजार १२० टन, संयुक्त खते २० हजार २८० टन या खतांचा समावेश आहे.आॅक्टोंबर महिन्यातील मंजूर साठ्यानुसार ९ हजार ६५ टन खतपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात कमीपुरवठा झाला. नोव्हेंबर महिन्यासाठी १० हजार ८७७ टन खतसाठा मंजूर आहे.

डिसेंबर, जानेवारी महिन्यात प्रत्येकी १२ हजार ८६ टन, फेब्रुवारी महिन्यात ९ हजार ६५ टन आणि मार्च महिन्यात  ७ हजार २५२ टन एवढ्या खतांचा पुरवठा अपेक्षित आहे.

एक ऑक्टोंबर ते शनिवार (ता.६) पर्यंत युरियाची १ हजार ६९२ टन, डिएपीची १ हजार ६६३ टन, संयुक्त खतांची ४ जार ५२७ टन, पोटॅशची ३८१ टन, सुपर फॉस्फेटची ९०४ टन आदी खतांची मिळून ९ हजार १७० टन विक्री झाली. शिल्लक खतामध्ये युरिया ८ हजार ६३२ टन, डीएपी ७७२ टन, संयुक्त खते १० हजार ५८८ टन, पोटॅश १ हजार ७११ टन, सुपर फॉस्फेट ३ हजार ४२० टन असे मिळून २५ हजार १७९ टन खतसाठा शिल्लक होता. नोव्हेंबर महिन्यातील मंजूर साठ्यानुसार लवकरच संयुक्त तसेच अन्य ग्रेडची खते उपलब्ध होतील, असे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या रब्बी हंगामात खते कमी पडणार नाहीत. विशिष्ट ग्रेडच्या विशिष्ट कंपनीच्या खतांचा आग्रह करू नये. नत्र, स्फुरद, पालाश हे घटक असलेल्या संयुक्त खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. - हनुमंत ममदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com