Agriculture news in Marathi Demand for filling of lake from Mahisal scheme | Agrowon

म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा काळ लोटला, तरी देखील या योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलाव अद्यापही पाण्याने भरून दिले नाहीत. परिणामी पाणी टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. तलाव भरून दिले नाही तर द्राक्ष, डाळिंब पिकासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान अटळ आहे. त्यामुळे योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव, बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा काळ लोटला, तरी देखील या योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलाव अद्यापही पाण्याने भरून दिले नाहीत. परिणामी पाणी टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. तलाव भरून दिले नाही तर द्राक्ष, डाळिंब पिकासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान अटळ आहे. त्यामुळे योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव, बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्‍यातील शेतीला या टंचाईत आधार मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे. वास्तविक पाहता हे आवर्तन मुख्य कालव्यातूनच जत तालुक्‍याच्या शेवटच्या लाभ क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे.

मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्‍यात द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. तर डाळिंबाच्या मृग बहाराची तयारी शेतकरी करू लागला आहे. आता या पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. तर काही ठिकाणी टॅंकरने शेतीला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. मुळात, एका बाजूला योजना सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला या योजनेच्या लाभ क्षेत्रात असणारे बंधारे, लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

सध्या जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यस्त आहे. परंतु त्यातून प्रशासनाने दुष्काळी पट्ट्यातील तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्यासाठी नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, तशा कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याबाबत बैठक झाली होती. त्यावर निर्णयही झाला. त्याचे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले. परंतू सध्या पाणी टंचाई आहे. आत्ताचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे होते पण त्यावर लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

योजना उशाला अन् कोरड घशाला
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य पंपहाऊस पासून अवघ्या काही अंतरावर आरग हे गाव आहे. या गावातील तलाव कोरडा पडला आहे. याचाच अर्थ असा की, योजना या गावापासून जवळ असून देखील पाणी दिले नाही. मग दुष्काळी भागातील तलाव कोणत्या आधारावर भरून देणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...