'पोल्ट्री'साठी आर्थिक मदतीची मागणी

'पोल्ट्री'साठी आर्थिक मदतीची मागणी
'पोल्ट्री'साठी आर्थिक मदतीची मागणी

अकोला  ः कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियामधून होत असलेल्या अफवांचा पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे. यामुळे व्यवसाय धोक्यात आला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे. याबाबत जिल्ह्यातील उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले.   जगभरात कोरोना विषाणूची दहशत तयार झाली आहे. काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी सोशल मीडियामधून कोंबडी मासांमुळे, अंडे खाल्ल्याने लागण होऊ शकते, अशा प्रकारचा प्रचार सुरू केला आहे. या अफवेमुळे ब्रायलर पक्षी व अंडी घेण्यास ग्राहक मागेपुढे करीत आहे. उत्पादकांकडे हजारो पक्षी आज तयार आहेत. त्यांना लागणारे खाद्य घालणेही आता शक्य राहिलेले नाही. कुक्कुटपालक हा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत प्रशासनाने तातडीने नुकसानाचे पंचनामे करीत शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गजानन डाबेराव, कौस्तुभ देशमुख, शेख इनायत, गुलरेज खान, नीलेश पाटील झोंबाडे, अन्वर ईस्माईल पठाण, मधुकर मोहाडे, शेख आसीफ शेख याकुब, फैजान खान आलिमखान, शेख लाल शेख चाँद यांच्यासह असंख्य कुक्कुटपालक उपस्थित होते. अमरावती, बुलडाण्याप्रमाणे सर्व्हे करा याबाबत व्यावसायिकांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अकोला जिल्ह्यात दरमहा पाच लाख मांसल पक्षी उत्पादन असून त्यासाठी प्रतिपक्षी १६५ रुपयांपर्यंत नुकसान झेलावे लागत आहे. तीन किलोचा पक्षी तयार करण्यासाठी २१० रुपये खर्च लागत असताना या पक्षापासून केवळ ४५ रुपये मिळत आहेत. १५ रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. हा अल्प दर पोल्ट्री उद्योगाला उदध्वस्त करीत आहे. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन या उद्योगाची सुरुवात केली होती. सध्या सर्वच पोल्ट्रीधारक अडचणीत आहेत. या अनुषंगाने अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात जे सर्वेक्षण केले जात आहे, त्याच आधारे अकोला जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याची मागणी शुभम महाले (शिरपूर), विक्रम आखरे (पुंडा), अक्षय ठाकरे (लोहारी), भरत ठाकरे (मुंडगाव), विजय आखरे (मुंडगाव), अनिल पाटील (कान्हेरीसरप), दिलीप तायडे (पोपटखेड) आदींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com