Agriculture news in Marathi, Demand for fodder camps in the district | Agrowon

सांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू ठेवण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा छावण्या बंद करण्यात येणार आहेत, मात्र जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगावसारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. १ ऑगस्टनंतर जनावरांचे हाल होतील. त्यामुळे जनावरांच्या चारा छावण्या सुरूच ठेवण्याची मागणी केली. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, असल्याचे सांगितले.

सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा छावण्या बंद करण्यात येणार आहेत, मात्र जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगावसारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. १ ऑगस्टनंतर जनावरांचे हाल होतील. त्यामुळे जनावरांच्या चारा छावण्या सुरूच ठेवण्याची मागणी केली. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. १३) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, खासदार संजय पाटील, धैर्यशिल माने, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आदी उपस्थित होते.

नदीतील पाणी वाहून जाते आहे; या पाण्यातून दुष्काळी भागातील तलाव सिंचन योजनांच्या माध्यमातून भरून घेण्याची मागणी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील सदस्यांनी केली. त्यावर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तलाव भरून घेण्याचे आदेश दिले. यावर पाठबंधारेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सिंचन योजनांमधून ३५ टीएमसी पाणी उचलले आहे. त्यासाठी ९५ कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. त्यापैकी ३५ कोटी रुपये वीजबिल भरले असून, उर्वरित थकीत आहे, ते भरल्याशिवाय योजना सुरू करणे अडचणीचे असल्याचे सांगितले.

महावितरणच्या प्रश्नांसाठी पुन्हा जोर बैठकाच
महावितरणकडून शेतकऱ्यांना वीजजोडणी, कोटेशन, डीपी मिळत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. महावितरण कंपनी कोटेशन, शेतीपंप आणि डीपी देण्यासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करते. मात्र, नियोजन समितीकडून दिलेल्या निधीपैकी अवघा २१ टक्के इतकाच निधी खर्च केलेला आहे. वीज कोटेशन मागायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा पर्याय सांगून परत पाठविले जाते. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रान्सफार्मर मिळत नसल्यामुळे द्राक्षे बागांचे मोठे नुकसान होते, यावर कायमस्वरूपी तोडगा काढा.

तलाव भरण्यासाठी टंचाईचा निधी का नाही?
पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात दिल्यास टॅँकरवर होणारा खर्च कमी होणार आहे. टंचाईग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. मात्र, सिंचन योजनांच्या वीजबिलाचा प्रश्न आल्यावर पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख गप्प बसले. वास्तविक त्यांनी टंचाईतून निधी देण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, आघाडीच्या काळात दिवंगत पतंगराव कदम यांनी असा निधी देऊन दिलासा दिला होता.


इतर बातम्या
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...