agriculture news in marathi, demand for frp paid a lump sum, parbhani, maharashtra | Agrowon

‘एफआरपी’ एकरकमी देणे बंधनकारक करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

परभणी : उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी देणे साखर कारखान्यांना बंधनकारक करावे. साखर निर्यात करण्याची मुभा द्यावी. निर्यातीवर अनुदान तसेच साखरेच्या साठ्यावर ९० टक्के बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.

परभणी : उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम एकरकमी देणे साखर कारखान्यांना बंधनकारक करावे. साखर निर्यात करण्याची मुभा द्यावी. निर्यातीवर अनुदान तसेच साखरेच्या साठ्यावर ९० टक्के बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.

साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक असताना बहुतांश साखर कारखानदारांकडे अजूनही एफआरपी थकीत आहे. सायखेडा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर या कारखान्याकडे २०१४-१५ मधील ऊस पेमेंट बाकी आहे. बीड जिल्ह्यातील एस.एन.एल. शुगर लि. युनिटच्या पवारवाडी (ता. माजलगाव) येथील जय महेश या कारखान्याकडे जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे ऊसबिल थकीत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. मराठवाड्यातील बळिराजा साखर कारखान्याने २ हजार २५० रुपये प्रतिटन प्रमाणे ऊसबिल काढले आहे. बाकी सर्वांनी १५०० रुपयांपासून २ हजार ५० रुपयांपर्यंतच बिले काढली आहे. एफआरपी एकरकमी देण्याची तरतूद कायद्यात असताना शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक होत आहे.

राज्यातील साखर कारखानदार एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा कायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या कायद्यातील तरतूद जाचक दिसते त्यास शेतकरी तसेच किसान सभेची संमती नाही. ऊस उत्पादकांची पिळवणूक थांबवून किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे ही मागणी शेतकऱ्यांतर्फे अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर, राजेभाऊ राठोड, पंडितराव गोरे, शिवराम शेळकेल आदींनी केंद्रिय कृषिमंत्र्यांकडे केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८...हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात...
पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या...पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार...
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरीसिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने...
कोल्हापुरातील बहुतांश तालुक्यांना...कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पावसाने रविवारी (ता. ३१...
सोलापुरातील चार मध्यम प्रकल्पांमध्ये...सोलापूर ः लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या...
टेंभू योजनेतून आटपाडी तालुक्यातील पंधरा...आटपाडी, जि. सांगली ः टेंभू योजनेच्या पाण्यातून...