नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रतिएकरी २५ हजार रुपये मदत द्यावी. देशातील २० राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत लष्करी अळीचे संकट आल्यामुळे राष्ट्रीय, राज्य आपत्ती घोषित करावी, आदी मागण्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केल्या आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या...

  • मका तसेच अन्य पिकांवरील अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने पिके नष्ट होत असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ प्रतिएकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी.
  • देशातील २० राज्यांत आणि महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या संकटाला राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती घोषित करावी.
  • अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नष्ट होत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तत्काळ पंचनामे करावेत.
  • अन्य पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक गाव, शिवारात प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणाव्यात. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रतिबंधक उपायाचे किट तसेच माहिती पोचवावी.
  • प्रादुर्भावामुळे बाधित मका खाल्ल्याने मृत्यू झालेल्या जनावराप्रकरणी योग्य तपासणी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी.
  • केंद्र व राज्य शासनाने सदर प्रकरणी तत्काळ टास्क फोर्स स्थापन करून उपाययोजना गतिमान कराव्यात.
  • पंतप्रधान पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार सार्वत्रिक किडीमुळे झालेल्या पीक नुकसानीची कोणतेही उत्पादकतेचे निकष न लावता जोखीम रकमेच्या ५० टक्के भरपाई तत्काळ अदा करावी.
  • कृषी विद्यापीठातील प्रत्येक शास्त्रज्ञास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे आदेश द्यावेत. सर्व कृषी विज्ञान केंद्रांना सार्वत्रिक उपाययोजना करण्यास बंधनकारक करावे.
  • अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव हे मंदीतून बाहेर पडण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांनी शेतकऱ्यांविरुद्ध केलेले कारस्थान आहे का याचा तपास करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com