agriculture news in marathi, demand to give extension for horticulture crop insurance scheme, pune, maharashtra | Agrowon

फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेवटच्या दिवसांमध्ये सतत बंद पडणाऱ्या सर्व्हरमुळे फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मृग बहारामधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू व चिकू या सहा फळपिकांसाठी ही विमा योजना आहे. बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपीकनिहाय वेगवेगळी ठेवली गेली. बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू या फळ पिकांकरिता १४ जून होती. चिकू व मोसंबी फळपिकासाठी एक जुलै तर डाळिंब पिकाकरिता १५ जुलै होती. 

पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेवटच्या दिवसांमध्ये सतत बंद पडणाऱ्या सर्व्हरमुळे फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मृग बहारामधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू व चिकू या सहा फळपिकांसाठी ही विमा योजना आहे. बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपीकनिहाय वेगवेगळी ठेवली गेली. बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू या फळ पिकांकरिता १४ जून होती. चिकू व मोसंबी फळपिकासाठी एक जुलै तर डाळिंब पिकाकरिता १५ जुलै होती. 

महा ऑरगॅनिक ॲन्ड रेस्युड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) अध्यक्ष, कृषिभूषण अंकुश पडवळे म्हणाले, की दुष्काळी स्थितीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळबागा जळत असल्यामुळे विमा उतरविण्यासाठी शेतकरी इच्छुक होते. मात्र, १० जुलैपासून सर्व्हर बंद होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाहीत. या योजनेमुळे कमी किंवा जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून विशिष्ट कालावधीसाठी विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळते. 

राज्यात यंदा डाळिंब बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. काही बागा पूर्ण तर काही बागा अर्धवट जळलेल्या आहेत. काडीमध्ये स्टोअरेज नसल्याने बागा जिवंत राहून देखील उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे विम्याच्या माध्यमातून थोडेफार नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.  गेल्या हंगामात देखील फळपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली होती. यंदा मुदतवाढ देण्याबाबत राज्याचे कृषी सचिव व आयुक्तांना कळविण्यात आले आहे, असे श्री.पडवळे यांनी स्पष्ट केले. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...