agriculture news in marathi, demand to give a water to drought affected area, sangli, maharashtra | Agrowon

'सिंचन योजनांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्या'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कृष्णा आणि वारणा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. सध्या लवादाच्या निकषानुसार जास्त पाणी धरणांमध्ये असल्यामुळे ते कोणतीही मोजदाद न ठेवता समुद्राकडे जात आहे. शासनाने हेच पाणी दुष्काळग्रस्त भागात दिल्यास टंचाईवर होणारा वारेमाप खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे.
- विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत, जि. सांगली.
 

सांगली  : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दमदार पाऊस झाला असला तरी, अद्याप दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टंचाई कायम आहे. सध्या कृष्णा आणि वारणा नद्या पुरामुळे दुथडी भरून वाहत असून हे पाणी कर्नाटकात जात आहे. हे वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात टंचाई निधीतून सोडण्यात यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्त भागातून होते आहे.

जिल्ह्यातील सुमारे १३६ गावे, ८७२ वाड्यांना १५५ टॅंकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यंदा पावसाची सुरवात खूपच उशिरा झाली. जिल्ह्यात आतापर्यंत यंदाच्या हंगामात केवळ नऊ दिवसांतच सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस झाला आहे. सरासरी पावसाची आकडेवारी मोठी दिसत असली तरी वास्तविक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव पूर्व, मिरज पूर्व या भागांत पावसाचे सातत्य नव्हते. त्यामुळे जो पाऊस पडला त्याचा पाणी पातळी वाढण्यासाठी उपयोग झाला नाही. परिणामी, दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अद्यापही पाण्याची टंचाई आहे.  
पावसाला विलंब झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागात खरिपाच्या पेरण्या लांबल्या. थोडा बहुत पाऊस पडल्यावर जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या.

गतवर्षी ३ ऑगस्टपर्यंत सरासरी ११३.३ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली होती, मात्र यंदा दुष्काळग्रस्त तालुक्यांसह ती अवघी ९०.४ मि.मी. आहे. सध्या कोयना आणि चांदोली धरणांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. परिणामी, दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वारणा आणि कृष्णा दोन्ही नद्यांमधून वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात सिंचन योजनांच्या माध्यमातून दिल्यास सध्या सुरू असणाऱ्या टॅँकरची संख्या कमी होईल, तसेच दुष्काळग्रस्त भागातील तलाव, बंधारे टंचाई निधीतून भरल्यास भविष्यात कराव्या लागणाऱ्या टंचाईवरील खर्चामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात सोडण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील मागणी करण्यात आली होती, मात्र वीजबिल भरायचे कुणी यावरून मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत मौन बाळगले होते.
 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...