agriculture news in marathi, demand for government to control over the price of hybrid seeds, nashik, maharashtra | Agrowon

हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण हवे ः आमदार दिपिका चव्हाण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना हायब्रीड बियाण्यांच्या वाढत्या किमतीसंदर्भात शेतकऱ्यांत असंतोष आहे. बीटी कापसाच्या धर्तीवर मक्यासह अन्य हायब्रीड बियाणे किमतीवर राज्य सरकारने नियंत्रण आणावे, असे निवेदन सटाणा विधानसभेच्या सदस्या आमदार दीपिका संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना दिले. 

पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना हायब्रीड बियाण्यांच्या वाढत्या किमतीसंदर्भात शेतकऱ्यांत असंतोष आहे. बीटी कापसाच्या धर्तीवर मक्यासह अन्य हायब्रीड बियाणे किमतीवर राज्य सरकारने नियंत्रण आणावे, असे निवेदन सटाणा विधानसभेच्या सदस्या आमदार दीपिका संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना दिले. 

निवेदनाचा आशय असा : आज राज्यात मका बियाण्याची चार किलोची बॅग १४०० ते १८०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. एकरी मक्याला दोन बॅग म्हणजेच आठ किलो बियाणे लागते. आजच्या बाजारभावानुसार एकरासाठी २८०० ते ३६०० रुपये खर्च हा फक्त बियाण्यांसाठी होतो. एक किलो बियाण्यांचा भाव हा ३५० ते ४५० रुपये किलो या दरम्यान येतो. महाराष्ट्रात एकरी सरासरी २० क्विंटल मका पिकतो. यंदाचा अपवाद वगळता शेतकरी १२ ते १४ रुपये प्रतिकिलोला खुल्या बाजारात मक्याची विक्री करतात. मक्याच्या खुल्या बाजारातील दराच्या तुलनेत २० ते २५ पट अधिक दराने बियाणे खरेदी करावे लागते. एकरभर मक्यातून जे २४ ते २८ हजार रुपये मिळतात, त्यातील दहा ते पंधरा टक्के रक्कम बियाण्यांसाठीच खर्ची पडतेय.

मका हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. बहुतांश हायब्रीड पिकांच्या बियाण्यांचे दर दरवर्षी नवे उच्चांक गाठत आहेत. वरील पार्श्वभूमीवर बीटी कापसाच्या धर्तीवर मक्यासह अन्य हायब्रीड बियाणे किमतीवर तातडीने नियंत्रणाची आवश्यकता निर्माण झाली असून, याबाबत तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...