मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकून

गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी राहिली. परिणामी देशातील विविध बाजारांमध्ये दरात २० ते ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. मध्य प्रदेशात हरभऱ्याला सरासरी ५१५० ते ५४०० रुपये, राजस्थानात ५१०० ते ५५०० रुपये, दिल्लीत ५२०० ते ५६०० रुपये आणि महाराष्ट्रात सरासरी ५२५० ते ५६०० रुपये दर मिळाले.
Demand per gram rate stays above guaranteed
Demand per gram rate stays above guaranteed

पुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी राहिली. परिणामी देशातील विविध बाजारांमध्ये दरात २० ते ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. मध्य प्रदेशात हरभऱ्याला सरासरी ५१५० ते ५४०० रुपये, राजस्थानात ५१०० ते ५५०० रुपये, दिल्लीत ५२०० ते ५६०० रुपये आणि महाराष्ट्रात सरासरी ५२५० ते ५६०० रुपये दर मिळाले. खरिपातील कडधान्य पिकांना बसलेला फटका आणि निर्यातीतील अडथळे यामुळे हरभरा दर हमीभावाच्यावर टिकून राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

सरकारने डाळींच्या वाढत्या दरामुळे आयातीला परवानगी, व्यापारी तसेच उद्योगांवर साठा मर्यादा आणि हरभऱ्यावर वायदाबंदी आदी निर्णय घेतले होते. त्यावेळी हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा खालच्या पातळीवर आले होते. मात्र वाढती मागणी आणि देशांतर्गत उत्पादनातील घटीमुळे निर्बंध असतानाही हरभऱ्याने पुन्हा हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. देशातील बहुतांश बाजारपेठांमध्ये हरभऱ्याचे दर हे ५१०० ते ५६०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत. वायदे बाजारातही सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील डिलेव्हरीचे सौदे हे हमीभावाच्यावर झाल्याने बाजार समित्यांमध्येही दर सुधारले आहेत.

वायद्यांमधील सुधारणा आणि मागणी असल्याने राजस्थानमधील बाजार समित्यांमध्ये ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. जयपूर बाजारात दर सुधारून ५२५० ते ५५०० रुपये, बिकानेरमध्ये ५१७० ते ५३५० रुपये, केकडी येथे ५०५० ते ५१०० रुपये आणि किशनगड बाजार समितीत ५००० ते ५२६० रुपये दर मिळाले. 

मध्य प्रदेशात मागणी काहीशी वाढली होती. त्यामुळे हरभरा दरात ५० ते १०० रुपयाने दर सुधारले होते. मध्य प्रदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये ४८०० ते ५५०० रुपये यादरम्यान दर होते. दरम्यान गत हंगामात हरभऱ्याला हमीभाव ५१०० रुपये तर या हंगामात नुकतेच जाहीर झालेला हमीभाव ५२३० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

राज्यातील दर राज्यातील बाजार समित्यांत हरभरा आवकेत चढ-उतार पाहायला मिळाले. तसेच मागणीही कमी जास्त होती. परिणामी गेल्या आठवड्यात हरभरा दरात ५० ते १०० रुपयांपर्यंत चढ-उतार झाले. अकोला बाजार समितीत सरासरी ५२०० ते ५५७५ रुपये, नागपूरमध्ये ५३४० ते ५६७० रुपये, लातूर बाजार समितीत ५१९० ते ५७०० रुपये दर मिळाले. येणाऱ्या काळातही राज्यातील दर स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

हरभरा बाजारातील स्थिती

  • ऑस्ट्रेलियातून जुलै महिन्यात हरभरा निर्यात घटली
  • खरीप कडधान्याला फटका बसल्याने हरभऱ्यावर भिस्त टिकून
  • कंटेनर जाहजांच्या तुटवड्याचा निर्यातीवर परिणाम
  • देशांतर्गत बाजारात दर हमीभावाच्यावर टिकून
  • सणांच्या पार्श्वभूमीवर हरभरा डाळीला वाढती मागणी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com