Agriculture news in marathi Demand for green chillies in Nashik, market prices stable | Agrowon

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, बाजरभाव स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सर्वसाधारण आहे. हिरव्या मिरचीची आवक १२७७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सर्वसाधारण आहे. हिरव्या मिरचीची आवक १२७७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर राहिले. लवंगी मिरचीला २५०० ते ४०००, तर ज्वाला मिरचीला ४००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये कांद्यांची आवक ८९९१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दर ३५० ते ८०० होते. बटाट्याची आवक ४६४० क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर १६०० ते २२०० होते. आल्याची आवक ३७९ क्विंटल झाली. त्यास ६००० ते ८००० प्रतिक्विंटल दर मिळाला. लसणाची आवक १४३ क्विंटल झाली. आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून त्यास किमान ३०००, तर कमाल ११००० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवाज जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. घेवड्याची आवक ३४२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० दर मिळाला. तर, घेवड्याची आवक घटल्याने दरांत तेजी होती. त्यास ६०००  ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ४६१ क्विंटल झाली. त्यास १००० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाले. 

फळभाज्यांच्या दरात सुधारणा झाली. त्यात टोमॅटोला ३०० ते ७००, वांगी १४० ते ३००, फ्लॉवर १२० ते ३०० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर, कोबीला ६० ते १५० असा दर प्रति २० किलोस मिळाला. ढोबळी मिरची ३५० ते ६०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा २०० ते ४००, कारले २०० ते ३५०, गिलके २०० ते ३५०, तर काकडीला २००ते ५५० दर मिळाला.

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक २८० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १००० प्रती क्विंटल मिळाला. मोसंबीची आवक २३० क्विंटल झाली. तिला १००० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक ८१३४ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५०० ते ५००० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजांची आवक ८० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. पपईची आवक १०० क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नारळाची आवक ९४० क्विंटल झाली. त्यास २१०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्यांची आवक ७४० क्विंटल झाली. दशहरी आंब्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५००० दर मिळाला. 

भाजीपाल्याचा प्रति १०० जुड्यांचा दर

कोथिंबीर १००० ते ६८००
मेथी  १५०० ते ४१००
शेपू ८०० ते २२००
कांदापात ८०० ते २७००
पालक  ३०० ते ५२५
पुदिना १०० ते १९०
 

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...