नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर स्थिर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक स्थिर आहे. हिरव्या मिरचीची आवक १२६२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५००ते ३००० रुपये दर मिळाला.
 Demand for green chillies in Nashik, prices stable
Demand for green chillies in Nashik, prices stable

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक स्थिर आहे. हिरव्या मिरचीची आवक १२६२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५००ते ३००० रुपये दर मिळाला. मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर राहिले. लवंगी मिरचीला १५०० ते २५००, तर ज्वाला मिरचीला २००० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहात कांद्यांची आवक १०६१४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दर २१० ते ७५० होते. बटाट्याची आवक ४५९५ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर १९२५ ते २२०० होते. आल्याची आवक २३२ क्विंटल झाली. त्यास ६५०० ते ७६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. लसणाची आवक ८७ क्विंटल झाली. आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यास किमान ४५५० तर कमाल ११००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

या सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची जास्त झाली. दर सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक २७६४ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० दर मिळाला. तर, घेवड्याला १६००  ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ४६३ क्विंटल झाली. त्यास १६०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाले. 

फळभाज्यांच्या दरांत सुधारणा झाली. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ४५०, वांगी २०० ते ४००, फ्लॉवर ७० ते २२० असे प्रति १४ किलो दर मिळाले. तर, कोबीला ७० ते १७० प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरचीला १५० ते ३५० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ५० ते २००, कारले ६० ते १७०,  गिलके १२० ते ३००, तर काकडीला १०० ते २२५ दर मिळाला. तर, दोडक्याला २५० ते ६०० रूपये दर मिळाला.

फळांमध्ये केळीची आवक ६१० क्विंटल झाली. दर ५०० ते १००० प्रती क्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ३५० क्विंटल झाली. तिला १८०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक १२९२४ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल २५० ते ३५०० व मृदुला वाणास ३५० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. पपईची आवक ४२० क्विंटल झाली. त्यास ८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नारळाची आवक ९४० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्यांची आवक कमी झाली. ती २०० क्विंटल झाली. दशहरी आंब्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com