नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी सर्वसाधारण; दर स्थिर

येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३०२ क्विंटल झाली. तर दर २२००ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते.
Demand for green chillies is normal in Nashik; Rate fixed
Demand for green chillies is normal in Nashik; Rate fixed

नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३०२ क्विंटल झाली. तर दर २२००ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. लवंगी मिरचीला २५०० ते ४५०० तर ज्वाला मिरचीला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक १७५५४ क्विंटल झाली. बाजारभाव ७०० ते ३००० प्रतिक्विंटल होते. बटाट्याची आवक ३९९९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २१५० ते २८५० दर होते. लसूणाची आवक ७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५६०० ते ११६०० दर मिळाला. आल्याची (अद्रक) आवक ४५१ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ८००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवाज जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ६०९५ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० दर मिळाला. तर घेवड्याला २००० ते ३३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याला आवक ४११ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ९००० ते १३००० दर मिळाला. गाजराची आवक ८३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७०० ते २२०० दर मिळाला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ३०० ते ११११, वांगी २२५ ते ४००, फ्लॉवर ७० ते २८० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ४० ते १७० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २०० ते ५०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ८० ते ३००, कारले १८० ते ४००, गिलके २५० ते ५००, काकडीला १५० ते ६०० दर तर दोडक्याला ३५० ते ८०० असा दर मिळाला.

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ८२० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ९७५ क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबाची आवक १०४९४  क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३०० ते ५००० व मृदुला वाणास ३०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. शहाळ्याची आवक ६७३ क्विंटल झाली.त्यास २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पपईची आवक ८० क्विंटल झाली. तिला ९०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com