Agriculture News in Marathi Demand for green chillies, okra and dodkya in the town | Page 2 ||| Agrowon

नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला चांगली मागणी राहिली. भुसारची आवक होत असून, उडदाची आवक वाढली आहे.

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला चांगली मागणी राहिली. भुसारची आवक होत असून, उडदाची आवक वाढली आहे. प्रती क्विंटलला सहा हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर मिळाला. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची दररोज साधारण ३५ क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटलला १५०० ते २५०० रुपयाचा दर मिळाला. भेंडीची ६५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३५०० रुपये व दोडक्याची ८ ते १० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते चार हजार रुपयाचा दर मिळाला. 

टोमॅटोची दर दिवसाला १४३ क्विंटलचा आवक झाली. टोमॅटोला प्रती क्विंटल ५०० ते १ हजार रुपयाचा दर मिळाला. वांग्याची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, फ्लॉवरची ७०१ हजार ते २ हजार, काकडीची ६० ते ६५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते २ हजार, कारल्याची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, बटाट्याची २४७ ते २६० क्विंटलची आवक होऊन ७०० ते १३००, शेवग्याची ४ ते ६ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार ५००, शिमला मिरचीची ३८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, दुधी भोपळ्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपयाचा दर मिळाला. 

लिंबाची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन२ हजार ते ४ हजार रुपयाचा दर मिळाला. मका कणसाची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन ५०० ते ८०० रुपयाचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, मुळे, चवळी, बीट, वाटाणा, डांगर, कांदा पात, पुदीना यालाही मागणी राहिली असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

दीड हजार क्विंटल भुसारची आवक 
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारची दर दिवसाला एक हजार पाचशे क्विंटलची आवक झाली. गावरान ज्वारीला १९०० ते २२००, बाजरीला १४७५ ते १७२५, करडईला ४८००, तुरीला ४५०० ते ५९००, हरभऱ्याला ४३०० ते ४९५०, मुगाला ४३०० ते ६९००, उडदाला ५ हजार ते ६ हजार ७००, गव्हाला १७०० ते  १९०० रुपये, सोयाबीनला ४ हजार ते ६३०० रुपयाचा दर मिळाला.

सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे
गवार, भेंडीला चांगला उठाव

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात पितृपंधरवड्यामुळे गवार, भेंडीला चांगला उठाव मिळाला. पण दरात किरकोळ सुधारणा झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

गत सप्ताहात पितृपंधरवडा सुरू झाला. या पंधरवड्यात होणाऱ्या पितृभोजनात गवार आणि भेंडीला विशेष स्थान असते. त्यामुळे गवार आणि भेंडीला मागणी वाढली. पण मागणीच्या प्रमाणात आवक फारशी नसल्याने त्याच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. शिवाय ती फारकाळ टिकून राहिली नाही. गवार आणि भेंडीचे दर तुलनेने कमीच आहेत. गवारची रोज प्रत्येकी १० ते १५ क्विंटल आणि भेंडीची १५ ते २५ क्विंटल अशी आवक राहिली. स्थानिक भागातूनच त्यांची सर्व आवक राहिली. 

गवारला प्रति क्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्या शिवाय हिरव्या मिरची, गाजर आणि काकडीलाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. त्यांची आवकही तशी जेमतेमच राहिली. हिरव्या मिरचीला प्रति क्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, गाजराला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर काकडीला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यामध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांनाही पुन्हा चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही तेजीत राहिले. भाज्यांची रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते ११०० रुपये, मेथीला १५०० ते २००० रुपये आणि शेपूला ७०० ते १००० रुपये असा दर 
मिळाला.

कांद्याचे दर स्थिर
बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक मात्र पुन्हा काहीशी कमी झाली. ३० ते ४० गाड्यांपर्यंत जेमतेमच आवक राहिली. पण मागणी असूनही कांद्याचे दर पुन्हा काहीसे स्थिर राहिले. कांद्याला प्रति क्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

कळमणा बाजारात सोयाबीन ४६०० ते ५५०० रुपये
नागपूर : केंद्र सरकारने १२ लाख मेट्रीक टन सोयाबीन आयातीचा निर्णय घेतल्यानंतर कळमणा बाजार समितीत देखील सोयाबीन दरात काहीशी घसरण अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ६३०० ते ७००० रुपये होते तर आवक अवघी आठ क्‍विंटलची नोंदविण्यात आली. सोमवारी (ता.२०) सोयाबीनला उच्चांकी १०१११ रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर मात्र दर ४६०० ते ५५०० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनची आवक दहा क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. 

बाजार समितीत नव्या सोयाबीनची प्रतीक्षा लागूनच आहे. नवी आवक झाल्यानंतर दर काय राहतील या बाबत व्यापाऱ्यांसह शेतकरी देखील साशंक आहेत. सोयाबीनमधील आर्द्रता आणि दर्जा पाहून दर ठरतो, असे व्यापारी सांगतात. परंतु सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने काढणी आणि मळणी झालेल्या सोयाबीनला देखील सूर्यप्रकाश मिळू शकला नाही. त्यामुळे ओलेच सोयाबीन विक्रीसाठी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

लातूरमध्ये कडधान्यांच्या दरात चढ-उतार
लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात गव्हाचे दर एकवेळचा अपवाद वगळता जवळपास स्थिर राहिले. उडीद, हरभरा, मूग, तूर आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. तर आठवड्यातून तीन वेळा आवक झालेल्या सोयाबीनच्या सरासरी दरात आठवड्याअंती किंचित सुधारणा पाहायला मिळाली. 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० ते २४ सप्टेबर दरम्यान उडदाची १८४३५ क्‍विंटल आवक झाली. २९७५ ते ४५२३ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या उडदाचे सरासरी दर ५७५० ते ७१८० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान राहिले. हरभऱ्याची एकूण आवक ९८४१ क्‍विंटल झाली. १२३६ ते ३२२७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ४७८० ते ४९५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. एकूण ७४२४ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाला सरासरी ६२०० ते ६४५० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. 

मुगाची आवक ९९७ ते ३१३२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात झाली. तुरीची आवक ७४४६ क्‍विंटल झाली. ११९३ ते १७५१ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या तुरीला सरासरी ६१०० ते ६४५० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान दर मिळाला. गव्हाची एकूण आवक ९८४४ क्‍विंटल झाली. १५२२ ते २४२८ क्‍विंटल कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. तर गव्हाला एकवेळचा अपवाद वगळता सरासरी १८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनची आठवडाभरात तीन वेळा मिळून २६५१० क्‍विंटल आवक झाली. 

६७८० ते १०६५० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या सोयाबीनचे सरासरी दर आठवड्याच्या शेवटी किंचित सुधारल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोयाबीनला सरासरी ६३१० ते ७४०० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...