दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
रब्बीसाठी ‘वान’चे पाणी देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
वान प्रकल्पातून या रब्बीसाठी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच अनेक वर्षांत वापर नसल्याने नामशेष झालेल्या पाटसऱ्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातून या रब्बीसाठी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच अनेक वर्षांत वापर नसल्याने नामशेष झालेल्या पाटसऱ्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वनाथ झाडोकार यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
पातुर्डा, पातुर्डा (खुर्द), खेळ दळवी ही गावे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील टोकावरील गावे आहेत. या गावांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. लाभक्षेत्रात शेवटच्या टोकावर असल्याने या भागाला सुविधा मिळत नाहीत. गेल्या दहा वर्षांत पाणी नसल्याने या भागातील पाटसऱ्या पूर्णतः नादुरुस्त झाल्या आहेत. कालव्यात काटेरी झुडुपे वाढली आहेत. शेतातील खाणाखुणाही नाहीशा झाल्या आहेत. पाणी सोडले तरी ते शेतात पोहचत नाही.
अकोला सिंचन विभागाकडे हस्तांतरित झाल्यापासून संग्रामपूर तालुक्यातील सिंचन व्यवस्था दुर्लक्षित आहे. मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत. या वर्षी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद यासह सर्व पिकांनी दगा दिल्याने शेतकरी रब्बी पिकांकडे वळला आहे. रब्बी पिकांना पाटसऱ्या दुरुस्त करून सिंचनाचे पाणी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अकोला जिल्ह्यात कार्यालय असल्याने संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकरी दुर्लक्षित झाले आहेत. अधिकारी व शेतकरी समन्वयाची गरज असल्याचे ही झाडोकार यांनी म्हटले आहे.
- 1 of 1023
- ››