Agriculture news in marathi Demand to the Guardian Minister to provide ‘Wan’ water for the rabbi | Agrowon

रब्बीसाठी ‘वान’चे पाणी देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

 वान प्रकल्पातून या रब्बीसाठी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच अनेक वर्षांत वापर नसल्याने नामशेष झालेल्या पाटसऱ्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
 

बुलडाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातून या रब्बीसाठी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच अनेक वर्षांत वापर नसल्याने नामशेष झालेल्या पाटसऱ्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वनाथ झाडोकार यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

पातुर्डा, पातुर्डा (खुर्द), खेळ दळवी ही गावे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील टोकावरील गावे आहेत. या गावांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. लाभक्षेत्रात शेवटच्या टोकावर असल्याने या भागाला सुविधा मिळत नाहीत. गेल्या दहा वर्षांत पाणी नसल्याने या भागातील पाटसऱ्या पूर्णतः नादुरुस्त झाल्या आहेत. कालव्यात काटेरी झुडुपे वाढली आहेत.  शेतातील खाणाखुणाही नाहीशा झाल्या आहेत. पाणी सोडले तरी ते शेतात पोहचत नाही.

अकोला सिंचन विभागाकडे हस्तांतरित झाल्यापासून संग्रामपूर तालुक्यातील सिंचन व्यवस्था दुर्लक्षित आहे. मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत. या वर्षी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद यासह सर्व पिकांनी दगा दिल्याने शेतकरी रब्बी पिकांकडे वळला आहे. रब्बी पिकांना पाटसऱ्या दुरुस्त करून सिंचनाचे पाणी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अकोला जिल्ह्यात कार्यालय असल्याने संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकरी दुर्लक्षित झाले आहेत. अधिकारी व शेतकरी समन्वयाची गरज असल्याचे ही झाडोकार यांनी म्हटले आहे.


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...