agriculture news in Marathi demand of hike in stock limit Maharashtra | Agrowon

कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कांदा खरेदीवर परिणाम होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कांदा खरेदीवर परिणाम होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर कोंडी सोडवण्यासाठी साठवणूक मर्यादा वाढवून द्या, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. 

याबाबत खासदार पवार यांनी मंत्री दानवे यांची बुधवारी (ता.२८) भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. कांदा व्यापारी व शेतकरी यांचा कांदा खराब होऊ नये म्हणून तातडीने पुढच्या दहा दिवसांची मुदत देऊन विक्रीसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच कांदा साठवणूक क्षमताही वाढवून देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा. 

लवकरच व्यापारी वर्गाशी चर्चा करून सुवर्णमध्य काढू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री दानवे यांनी दिल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांचे वाणिज्य मंत्र्यांना पत्र
घाऊक व्यापाऱ्यांची साठवणूक मर्यादा मर्यादा २५ टनांवरून १०० टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनांवरून १०  करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही लवकरच दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकार त्वरित सकारात्मक पाऊल उचलेल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...