‘मागेल त्याला शेततळे’चे अनुदान वाढवण्याची मागणी

Demand to increase grant for 'fields to ask for him'
Demand to increase grant for 'fields to ask for him'

दहिवडी, जि. सातारा : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी माण मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत वीरकर यांनी केली आहे. याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. टंचाई काळात पिके जगविण्यासाठी शेततळ्यांचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. सध्या ३०:३०:३ मीटर आकाराचे शेततळे तयार करण्यासाठी शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. २०१४ पूर्वी याच आकाराचे शेततळे तयार करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ८२ हजार रुपये इतके अनुदान दिले जात होते. 

त्यामुळे सहा वर्षांमध्ये वाढलेली महागाई लक्षात घेता शेततळे तयार करण्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. ही रक्कम एक लाख दहा हजार रुपये करावी, अशी मागणी प्रशांत वीरकर यांनी मंत्री दादा भुसे, विश्वजित कदम यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शेततळ्यांसाठी अनुदानात वाढ करून ते एक लाख रुपयांपर्यंत करावे, अशी विनंती मंत्री भुसे यांना केली आहे. आगामी अर्थसंकल्पात या मागणीची दखल घेवून निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा श्री. वीरकर व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com