agriculture news in Marathi, Demand increased for Mango, Maharashtra | Agrowon

अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 मे 2019

पुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकण आणि कर्नाटक राज्यातून हापूससह विविध आंब्यांची सुमारे २५ हजार पेट्या आवक झाली होती. यामध्ये कच्च्या आंब्याचे प्रमाण जास्त होते. मात्र अक्षय तृतीयेसाठी तयार आंब्याला मागणी असल्याने त्याचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कमी झाले होते. 

पुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकण आणि कर्नाटक राज्यातून हापूससह विविध आंब्यांची सुमारे २५ हजार पेट्या आवक झाली होती. यामध्ये कच्च्या आंब्याचे प्रमाण जास्त होते. मात्र अक्षय तृतीयेसाठी तयार आंब्याला मागणी असल्याने त्याचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत कमी झाले होते. 

याबाबत बोलताना कोकण हापूसचे आडतदार करण जाधव म्हणाले, की अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला सर्वसामान्य ग्राहकाकंडून मागणी वाढली आहे. यानिमित्ताने बाजारातील आवक वाढली असली तरी आवकेमध्ये कच्च्या आंब्याचे प्रमाण जास्त आहे. रविवारी (ता. ५) १० हजार पेट्यांची आवक झाली होती. मात्र पिकलेल्या आंब्याचे प्रमाण कमी असल्याने दर थोडे वाढलेले आहेत. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर तुलनेने पेटीमागे कमी झाले आहेत.

गेल्या आठवड्यात ४-८ डझनच्या पेटीला २ ते ३ हजार तर ८ ते १० डझनच्या पेटील अडीच ते साडेतीन हजार रुपये होते. ते आता पाचशे रुपयांनी कमी झाले आहेत. कर्नाटक आंब्याचे प्रमुख आडतदार रोहन उरलळ म्हणाले, की अक्षय तृतीयेनिमित्त मागणी सुमारे ३० टक्क्यांनी वाढली असून, कर्नाटक राज्यातून सुमारे २० हजार पेट्या आणि करंडीची आवक झाली होती. आवक वाढल्याने दरातदेखील २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.  

विविध आंब्यांचे दर खालीलप्रमाणे 
आंबा (कर्नाटक) लालबाग २०-३०, हापूस (४-५ डझन) ५००-१०००, पायरी (४ डझन) ४००-८००. तोतापुरी - २०-३५, मल्लिका - ३५-४५, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १५००-३०००, (८ ते १० डझन) तयार २००० ते ३५००. 

टॅग्स

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...