गुजरातमधून गुळाला मागणी वाढली

यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे. देशभरात कोरोनाचे सावट कमी होत असल्याने बाजारपेठा पूर्ववत सुरू होत आहेत. याचा फायदा यंदा पहिल्या गुळाला होणार आहे. सध्या येथील बाजार समितीत गुळास क्विंटलला ३७०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे.
Demand for jaggery increased from Gujarat
Demand for jaggery increased from Gujarat

कोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे. देशभरात कोरोनाचे सावट कमी होत असल्याने बाजारपेठा पूर्ववत सुरू होत आहेत. याचा फायदा यंदा पहिल्या गुळाला होणार आहे. सध्या येथील बाजार समितीत गुळास क्विंटलला ३७०० ते ४००० रुपये इतका दर मिळत आहे. 

गूळ हंगामास हळूहळू प्रारंभ होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने गुऱ्हाळे सुरू होत आहेत. यामुळे येथील बाजार समितीत गुळाची आवक ही वाढत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र तितकेच असल्याने त्याचे उत्पादन गेल्या वर्षीइतकेच राहील, असा अंदाज गूळ क्षेत्रातील सूत्रांचा आहे. सप्ताहात कोल्हापूर बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. या सप्ताहात गूळ पॅकिंग वादावरून सौद्यात खंड पडला. पण त्यानंतर गुळाच्या दरात काहीशी वाढ होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी गुजरातमधील बाजारपेठेत शांतता होती. 

तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गुजरातमधील व्यापारी कोल्हापूर भागातील गूळ घेण्यास कचरत होते. यामुळे येणाऱ्या हंगामात गुळाची अपेक्षित खरेदी होईल की नाही, याबाबतची चर्चा येथील व्यापाऱ्यांत होती. परंतु गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याने व देशभरातील बाजारपेठा सुरू झाल्याने गुजरातेतील शीतगृहात असणाऱ्या गुळाला मागणी वाढू लागली. दुसऱ्या लाटेच्या वेळी ही सर्व शीतगृहे गुळाने तशीच भरून राहिली. विक्री नसल्याने यंदाच्या हंगामातील पुरेशा खरेदीवर प्रश्‍नचिन्ह होते. पण गतीने खुल्या होणाऱ्या बाजारपेठा गुळासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरल्या. यामुळे येत्या काही दिवसांत तरी गुळाला चांगला दर राहील हे निश्‍चित असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

कर्नाटकातील गुळापेक्षा चांगला दर  सध्या गुजरात बाजारपेठेत कोल्हापूर बरोबरच सांगली व कर्नाटक भागातून ही गूळ जात आहे. कोल्हापुरातील दर्जेदार गुळाला सांगली, कर्नाटकातील गुळापेक्षा चांगला दर मिळत आहे. जिल्ह्यातील गूळ उत्पादकांनी दर्जेदार गूळ तयार करून जास्तीत जास्त दर घ्यावा, असे आवाहन गूळ उद्योगातील सूत्रांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com