'उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाच्या कायद्याची मागणी करा'

Demand a law based on production costs ः Budhajirao Mulik
Demand a law based on production costs ः Budhajirao Mulik

नगर : उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव असणारा कायदा करण्याची मागणी करा. शेती हा एक फार व्यापक व अवघड उद्योग आहे. परदेशातील शेतीविषयी बोलायचे तर तिथल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुविधा दिल्या जातात. शेतीसाठी दिले जाणारे पाणी सरकारी खर्चाने आणि पिकासाठी योग्य असे शुद्ध पाणी पुरवले जाते. उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव असणाऱ्या कायद्याची मागणी करा, असे मत कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. 

संगमनेर येथे आर. के. फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या कृषिभूषण रावसाहेब कडलग स्मृती पुरस्कार वितरण झाले. अध्यक्षस्थानी कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक होते. बापूसाहेब भोसले, अशोक काळे, डॉ. पांडुरंग वाठारकर, शिवाजी जगताप, डॉ. सुभाष म्हस्के, आबासाहेब थोरात या वेळी उपस्थित होते. 

डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘दिवसा पिकांची वाढ होत असते त्यामुळे दिवसा अखंडित वीजपुरवठा करायला हवा. अशा पद्धतीने दिवसा पिकाला पाणी मिळाल्यास उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होईल. सरकारी सुविधेअभावी उत्पन्न घटल्यास पीकनिहाय नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद; तसेच पेन्शन अशा अनेक सुविधा परदेशांत असतात. आपल्या देशातही शेतकऱ्यांसाठी अशा सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणयाची गरज आहे.’’

या प्रसंगी डॉ. पांडुरंग वाठारकर, अंकुश कानडे, रेखा मुळे, शिवाजी जगताप, अशोक काळे, बापूसाहेब भोसले यांची भाषणे झाली. आर. के. फाउंडेशनचे अध्यक्ष कृषिभूषण रवींद्र कडलग व कीर्ती कडलग यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र कडलग यांनी आभार मानले. स्मिता गुणे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com