प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणी

गवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत आणि सौंदय प्रसाधने निर्मितीमध्ये वापरतात.ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल,सिट्रोनॉलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत.सूप, सॉस, वाईन, शीतपेये, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरतात.
Demand for lemon grass in the processing industry
Demand for lemon grass in the processing industry

गवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत आणि सौंदय प्रसाधने निर्मितीमध्ये वापरतात.ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल,सिट्रोनॉलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत.सूप, सॉस, वाईन, शीतपेये, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरतात. गवती चहा ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. भारतामध्ये केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यात याची मोठी लागवड आहे. गवती चहाला एक विशिष्ट सुगंध असतो. रोजच्या चहामध्ये गवती चहाची पाने वापरतात. तसेच औषधे निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. गवती चहामध्ये फेनॉल्स आणि फ्लेवोनॉइड्स ही फायटोकेमिकल्स असतात. केरळमध्ये गवती चहाच्या पानापासून तेल काढण्याचा उद्योग विकसित झाला आहे.

औद्योगिक फायदे

  • गवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत आणि सौंदय प्रसाधने निर्मितीमध्ये वापरतात.
  • सूप, सॉस, वाईन, शीतपेये, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरतात.
  • साठवण्याच्या धान्यांमध्ये कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
  • तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून कागद निर्मिती करता येते.
  • गवती चहाची पावडर जनावरांच्या खाद्यात वापरल्यास जनावारांची रवंथ करण्याची क्षमता वाढते.
  • गवती चहाचा काढा 

  • गवती चहाची पाने स्वच्छ धुवून छोटे छोटे तकडे करावेत.
  • पानांचे तुकडे पाण्यात १० मिनिटे उकळून घ्यावेत. हा काढा गाळून घ्यावा.
  • गवती चहा, लवंग, आले, काळीमिरी आणि दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी, खोकल्यावर गुणकारी आहे.
  • काढा थंड झाल्यास तो शितपेयामध्ये सद्धा वापरू शकतो. यामुळे शितपेयाला विशेष चव येते.
  • पानांचा काढा घाम आणणारा आणि ज्वरनाशक आहे.
  • आरोग्यदायी फायदे

  • गवती चहामध्ये असलेल्या या फायटोकेमिकल्समुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते.
  • ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल,सिट्रोनॉलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतूनाशक, रेचक, उपदंशी, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.
  • सर्दी, खोकला, पोटदखी, डोकेदखी आणि तणावग्रस्त परिस्थिती वर प्रभावी पारंपारीक औषधी म्हणून उपयोगात येते.
  • शारीरिक थकवा किंवा डोकेदुखी यावर उपाय म्हणून गवती चहा उपयोगी आहे. संधीवात झालेल्या व्यक्तीसाठी हा चहा पिणे योग्य ठरते.
  • गवती चहा अर्क लठ्ठपणा, दाह, आणि अतिरक्त दाब कमी करण्यास मदत करते.
  • गवती चहामधील अत्यावश्यक तेल आतड्याची सूज, हिरड्याची सूज, घशातील सूज, विषाणूच्या संसर्गामुळे होणारा जठराचा व आतड्याचा दाह, श्वासोश्वासाचा संसर्ग रोग आणि घश्याचे दुखणे यांच्या लक्षणांपासून आराम देते.
  • गवती चहाच्या तेलाचे २ ते ३ थेंब गरम पाण्यात टाकून वापरल्याने जठराचा त्रास कमी होतो.
  • यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
  • संपर्क- सुचित्रा बोचरे, ९३७०९३५५३८ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com