Agriculture news in marathi Demand for lemons, oranges, rates increased | Agrowon

पुण्यात लिंबू, संत्र्यांची मागणी, दर वाढले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 एप्रिल 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. उन्हाळ्यामुळे लिंबाची आणि संत्र्यांची मागणी वाढल्याने दरात मोठी वाढ झाली होती.

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. उन्हाळ्यामुळे लिंबाची आणि संत्र्यांची मागणी वाढल्याने दरात मोठी वाढ झाली होती. तर फ्लॉवरची आवक तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली होती. 

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये हिमाचल प्रदेशातून सुमारे ३ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, राजस्थानहून ३ ट्रक गाजर, मध्य प्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती, कोबी १० टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो ७ हजार क्रेट, मटार दोनशे गोणी, गाजर चार टेम्पो, अखंड चिंच २ टन, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ४० ट्रक बटाटा आवक झाली होती. तर गावरान कैरी ५ टेम्पो आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : ८०-१२०, बटाटा : ८०-१४०, लसूण : ४००-७००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी २००-२२०, पापडी : २५०-३००, पडवळ : १४०-२००, फ्लॉवर : १५०-१८०, कोबी : ५०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१४०, शेवगा : १००-२००, गाजर : ८०- १२०  स्थानिक - ६०-७०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : ५५०-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, तोतापुरी कैरी - २००-२५०, गावरान - १००-२००, चिंच अखंड - २५०-३५०, फोडलेली - ७००-९००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे दर दबावाखाली
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख ५० हजार तर मेथीची २५ हजार जुड्या आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१३००, मेथी : ८००-१५००, शेपू : ६००-८००, कांदापात : ६००-९००, चाकवत : ६००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ३००-४००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-६००, पालक : ४००-६००. 

सुमारे पंधरा टन द्राक्षांची आवक 
फळबाजारात लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, संत्री अवघी ३ तर मोसंबी सुमारे १५ टन, डाळिंब ३० टन, पपई १५ टेम्पो, चिकू सुमारे २ हजार गोणी, कलिंगड २५ आणि खरबूज ५० टेम्पो, पेरू १०० क्रेट , स्ट्रॉबेरी दीड टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागातून १५ टन आवक झाली होती. 
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १०००-१५००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-४५० (४ डझन) : १२०-२२०, संत्रा : (१० किलो) : ७००-२०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : १०-४०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ८-१२, खरबूज : १०-१७, पपई : ८-१२, चिक्कू (१० किलो): १००-१०००, स्ट्रॉबेरी (२ किलो) ८०-२००. पेरू (२० किलो) - १५०-२५०. द्राक्षे - सुपर सोनाका (१५ किलो) ५००-७००, माणिक चमन (१५) ४००-६००. 

लॉकडाउनमुळे फुलांची मागणी घटली 
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे प्रशासनाने केलेल्या अंशतः टाळेबंदीत मंदिरे बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.  तर लग्नसमारंभावरील मर्यादा, रद्द केलेल्या यात्रा, जत्रांमुळे फुलांची मागणी घटली आहे. प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१५, गुलछडी : २०-४०, बिजली : १०-२०, कापरी : १०-२०, शेवंती : ५०-८०, मोगरा : १००-२००, अ‍ॅस्टर : (सुटा) २०-३० (जुडी) ३-५, गुलाब गड्डी (बारा नगांचे दर) : ५-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल (५० काडी) : ३-६, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : ४०-६०, शेवंती काडी : ५०-८०, लिलियम (१० काड्या) : ६००-८००, ऑर्चिड : २००-३००, ग्लॅडिओ : ३०-५०.

मासळीची आवक कमी 
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (दि.४) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची १५० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दोन टन आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली होती. तर होळीसाठी नावा किनाऱ्यावर आल्याने मासेमारी कमी झाल्याने आवक कमी झाली परिणामी दरात वाढ  झाली होती.  माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव)  
  पापलेट : कापरी : १६०० मोठे १५००, मध्यम : १०००-१२००, लहान ८००, भिला : ६००, हलवा : ५५०-६००, सुरमई : ६००-१०००, रावस : लहान ६००-७००, मोठा : ९००, घोळ : ७००, करली : ३६०, करंदी : (सोललेली) ४८०, पाला : १०००, वाम : पिवळी ६००-८००, ओले बोंबील : २००-२८०, 
  कोळंबी ः लहान २८०-४००, मोठे ६५०-८५०, जंबो प्रॉन्स : १४०० किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १२००, मोरी : २८०- ३६०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०-२८०, चिंबोऱ्या : ६००-६५०. 
  खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : २४०, नगली : २८०-३६०, तांबोशी : ४००-४८०, पालू : २८०, लेपा : २८०, शेवटे : २८० बांगडा : लहान २८० , मोठे ३००-३६०, पेडवी : १२०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : ३००, खुबे : ११०-१२०, तारली : 
२००, 
  नदीची मासळी : रहू : १४०- १६०, कतला : १६०, मरळ : ४८०-६००, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ६००. 
  चिकन : चिकन : २४०, लेगपीस : २८० जिवंत कोंबडी : १९०, बोनलेस : ३२०. 
  अंडी : गावरान : शेकडा : ८३० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४२५ डझन : ६० प्रतिनग : ५. 
 मटण : बोकडाचे : ६८० बोल्हाईचे : ६८० खिमा : ६८०, कलेजी : 
७२०. 
 


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...