Agriculture news in marathi Demand for mango increased, Sorghum rates lower and higher | Agrowon

औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर कमी अधिक 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत काही दिवसांपासून विविध ठिकाणांहून आवक होत असलेला आंबा भाव खातो आहे.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत काही दिवसांपासून विविध ठिकाणांहून आवक होत असलेला आंबा भाव खातो आहे. बदाम, लालबाग व थोड्याबहुत प्रमाणात हापूसची आवक बाजारात होते आहे. सोमवारी (ता. ५) बाजार समितीमध्ये १३ क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याला ७००० ते ९००० रुपये तर सरासरी ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० मार्चला ११ क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याचे सरासरी दर ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३१ मार्चला ८ क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याला सरासरी ७५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. या दिवशी आंब्याचे जास्तीचे दर प्रतिक्‍विंटल १० हजारांपर्यंत पोहचले होते. १ एप्रिलला १२ क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याला सरासरी ७५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. आंब्याची होणारी आवक सामान्यतः: व्यापारी वर्गाकडूनच होते आहे. येत्या काही दिवसांत वाढण्याची आशा आहे. 

हरभरा, ज्‍‌वारीच्या आवकेत चढ-उतार 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान हरभऱ्याची जवळपास ८४ क्‍विंटल आवक झाली. हरभऱ्याची आवक ४ ते ३५ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात झाली. या हरभऱ्याला सरासरी ४२२५ ते ४६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ज्वारीची एकूण आवक २०७ क्‍विंटल झाली. २१ ते ७५ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या ज्‍वारीला सरासरी १७५० ते २१०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाले. 

तूर, गहू, बाजरी स्थिर 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान तुरीची २९ क्‍विंटल आवक झाली. ३ ते १९ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक आवक झालेल्या तुरीचे सरासरी दर ५७५० ते ६१७५ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. गव्हाची आवक सर्वाधिक १०२३ क्‍विंटल झाली. ११३ ते ३७७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाचे सरासरी दर १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. बाजरीची चार दिवसांत तीन वेळा आवक झाली. ५ ते १७ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी ११३० ते ११४५ रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...