आंबा उत्पादकांची विमा परताव्याची मागणी

आंबा उत्पादकांची विमा परताव्याची मागणी
आंबा उत्पादकांची विमा परताव्याची मागणी

जालना : फळपिकाचा विमा उतरविल्यानंतर त्याच्या परताव्यासाठी आवश्‍यक तापमान, नैसर्गिक आपत्तीच्या नोंदीची माहिती पुरव्यादाखल सादर करून आंबा उत्पादकांनी विमा परताव्याची मागणी केली आहे. त्यासाठी न्यू इंडिया इंश्‍युरन्स कंपनीच्या भोकरदन येथील प्रतिनिधींना शुक्रवारी (ता. ६) लेखी निवेदन सादर केले. 

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी न्यू इंडिया इंश्‍युरन्स कंपनी लिमिटेडकडे २०१८ या वर्षात आंबिया बहारासाठी पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत विमा संरक्षण घेतले. अवेळी पाऊस, जास्त तापमान, टप्पा अ, ब, कमी तापमान याबाबत हवामान धोके व गारपिटीकरिता ऐच्छिक सहभाग नोंदविला. आंबा पिकासाठी शेतकऱ्यांनी हेक्‍टरी १ लाख २१ हजार अधिक गारपिटीसाठी ४०३३३ असे एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले. 

अवेळी पाऊस व गारपीट झाली नसल्याने नमूद संपूर्ण विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार नाही. परंतू २८,२९ व ३० जानेवारी या दिवशी अनुक्रमे ८ डिग्री, ७ डिग्री व ११ डिग्री इतक्‍या कमी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या विमा संरक्षण प्रकारात हेक्‍टरी ३६ हजार ३०० रुपयांच्या परताव्यासाठी पात्र आहोत.

याशिवाय २७, २८ व २९ एप्रील २०१९ या तिनही दिवशी अनुक्रमे ४४ डिग्री, ४४ डिग्री व ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. दैनंदिन कमाल तापमान सलग तीन दिवस ३८.५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले. तर, ३०२५० रुपये पहिल्या टप्प्यासाठी मिळणे आवश्‍यक आहे. १ एप्रिल ते ३१ मे २०१९ या कालावधीत ४२.५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिले, तर १८ हजार २५० रुपयांच्या दुसऱ्या (टप्पा ब) टप्प्यात बसत असल्याचा दावा आंबा उत्पादकांनी केला.

एकत्रितपणे ८४ हजार ७०० रुपये प्रति हेक्‍टरीप्रमाणे विमा रक्‍कम द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com