agriculture news in Marathi, demand of Marathwada Water grid after Public hearing, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी जनसुनावणी घेऊन करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक जनसुनावणी घेतल्यानंतरच करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या परभणी शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोळा हजार कोटी रुपये खर्च करून वॉटर ग्रिडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही बाब जनतेसाठी दिलासादायक आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी काही बाबींचा खुलासा करून शंकांचे समाधान करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिडची संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक जनसुनावणी घेतल्यानंतरच करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या परभणी शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोळा हजार कोटी रुपये खर्च करून वॉटर ग्रिडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही बाब जनतेसाठी दिलासादायक आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी काही बाबींचा खुलासा करून शंकांचे समाधान करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिडची संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

पारदर्शक पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी करावी. या योजनेच्या यशस्वितेबाबत मराठवाडा जनता विकास परिषदेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरदेखील विचार करणे आवश्यक आहे. यामध्ये ही योजना इस्राईलच्या धर्तीवर तयार केलेली आहे, असे सांगितले जात आहे. 

परंतु इस्राईलपेक्षा मराठवाड्याचे क्षेत्रफळ तीनपट आहे. लोकसंख्यादेखील इस्राईलपेक्षा खूप जास्त आहे. वॉटर ग्रिडमुळे जनतेच्या हक्काच्या पाण्याचे बाजारीकरण होण्याची भीती आहे. अत्यंत कमी दरडोई उत्पन्न असलेल्या मराठवाड्यातील जनतेला हे परवडण्याचा प्रश्नदेखील आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतील दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी मोफत दिले जाणार आहे की नाही, याबाबत स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. 

मराठवाड्यातील, परभणी जिल्ह्यातील १२ गाव, २० गाव आदी अनेक गाव पाणीपुरवठा योजना अयशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये १ हजार ३३० किलोमीटर मुख्य पाइपलाइन टाकून मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील १२ हजार ९७८ गावे जोडणारी वॉटर ग्रिड योजनेच्या यशस्वितेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठवाड्यातील तुटीच्या पर्जन्यमानाच्या भागातील पाणी अतितुटीच्या भागात नेणे योग्य होईल का? कोकणातील पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उचलून गोदावरी खोऱ्यांमध्ये आणण्यापूर्वीच त्या पाण्यावर वॉटर ग्रिड तयार करणे, म्हणजेच घोडा घेण्याअगोदर खोगीर विकत घेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या योजनेची संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून 
द्यावी. 

मराठवाड्यातील लाभधारक जनतेची जनसुनावणी करूनच या योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ थोरे, सचिव रामकृष्ण पांडे, अनंतराव देशमुख, प्रा. किसन चोपडे, केशव थोरे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन बियाणे उगवणीबाबत ९२५०...नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
‘आरबीआय’चे नियंत्रण सहकार मोडीत...सातारा : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे...
खरिपाची ३१५ लाख हेक्टरवर पेरणी नवी दिल्ली: यंदा देशभरात मॉन्सून वेळेआधीच दाखल...
खानदेशात मृग बहारातील केळी लागवड...जळगाव ः खानदेशात मृग बहार (जून व जुलैमध्ये लागवड...
डाळिंबाच्या विम्याचे पैसे वर्षानंतरही...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या हवामानावर...
सदोष बियाणे उत्पादक कंपन्यांनी भरपाई...अमरावती: सदोष बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या...
बंदरात अडकलेल्या आयात वस्तू सोडा पुणे : चीनमधून आयात होत असलेल्या सुट्या भागांचे...
बारा हजार कोटींची कीडनाशकांची बाजारपेठ...पुणे : केंद्र शासनाने कीटकनाशकांवर आणलेल्या...
पणन संचालकांसह परभणी जिल्हा ...औरंगाबाद ः जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या...
सोयाबीनची उगवण न झाल्याने जड अंतकरणाने...अकोला ः बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर...
राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने...
लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी ३५ हजार...पुणे : देशातील लघू अन्नप्रक्रिया समूहांसाठी (...
लोणच्याच्या कैरीचे उत्पादन घटलेनाशिक : चालू वर्षीच्या हंगामात नैसर्गिक...
वराहपालन, अन्य पूरक व्यवसायातून आर्थिक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे येथील सुनील देसाई...
संयुक्त कुटुंबाने दुग्धव्य़वसायातून दिली...खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५...
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात बंदी असतानाही...अमरावती : जलपुनर्भरण, जलसंवर्धनाच्या...
बोगस बियाणेप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल...मुंबई : ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुणे : मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यातही...
लोकसहभागातून गावे समृद्ध करा :...कोल्हापूर : लोकसहभागातून गावेच्या-गावे समृद्ध करा...
लालपरीचा संचित तोटा सहा हजार कोटींवर सोलापूर : लॉकडाउनच्या शिथिलतेनंतरही एस.टी....