agriculture news in Marathi demand of mosambi plant double Maharashtra | Agrowon

मोसंबी कलमांची दुप्पट विक्री 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद स्थितीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात मोसंबी लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य देण्याची चित्र आहे. एरवी होणाऱ्या मागणीपेक्षा दुपटीने झालेली कलमांची विक्री याबाबत अंगुलीनिर्देश करते आहे.

औरंगाबाद : पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद स्थितीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात मोसंबी लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य देण्याची चित्र आहे. एरवी होणाऱ्या मागणीपेक्षा दुपटीने झालेली कलमांची विक्री याबाबत अंगुलीनिर्देश करते आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळसह परिसरातील काही गावांतून शेतकरी विविध नर्सरीच्या माध्यमातून दरवर्षी मोसंबी कलमांची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. आडूळ येथे जवळपास ३० नर्सरी असून या माध्यमातून किमान दहा लाखापर्यंत कलमांची विक्री दरवर्षी होत असते. साधारणतः सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये बांधणी केलेली रोपे पावसाचे आगमन झाल्यानंतर मागणीनुसार विक्री केल्या जातात. 

सधारणतः १० लाख कलमांची विक्री आडूळसह परिसरातून होत असते. यंदा मात्र कलमांच्या विक्रीबाबत प्रचंड अनुकूल स्थिती असल्याचे चित्र आहे. एरवी तयार केलेल्या कलमा पूर्णपणे विक्री होतील की नाही याची चिंता असते. यावेळी मात्र नेहमीपेक्षा जवळपास दुपटीने मागणी वाढल्याने कधी नव्हे ती ऑगस्टमध्येच पुन्हा कलमे बांधण्याची वेळ आली आहे.

त्यातही अनेक मोसंबीची कलम तयार करणारे उत्पादक मागणीनुसार पुरवठा करू शकत नसल्याची स्थिती आहे. केवळ मराठवाड्यातच नव्हे तर विदर्भ आणि राज्याच्या इतर भागातूनही मोसंबीच्या कलमांची मागणी होत असल्याची माहिती आडूळ सह परिसरातील नर्सरी धारक शेतकऱ्यांनी दिली. 

राज्यात जवळपास मोसंबीचे ३३ हजार हेक्‍टर क्षेत्र उत्पादनक्षम असून या क्षेत्रातून जवळपास ३ लाख ५५ हजार मेट्रिक टन मोसंबीचे उत्पादन होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया
यंदा पाऊस वेळेवर व नेहमीच्या तुलनेत चांगला आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांचा फळपीक लागवडीकडे कल वाढला आहे. त्यातही शेतकरी मोसंबी या फळपिकांना प्राधान्य देत असल्याचे कलम विक्री वरून स्पष्ट दिसून येते. 
- रामराव वाघ, श्रीराम नर्सरी, आडुळ, जि. औरंगाबाद. 
 


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...