खानदेशात रब्बीसाठी सव्वालाख टन खतांची मागणी

जळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा खरिपातील मोठा साठा शिल्लक आहे. रब्बी हंगामदेखील अपेक्षेपेक्षा अधिक असू शकतो. यामुळे सुमारे सव्वालाख मेट्रिक टन विविध खतांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली.
Demand for one lakh tonnes of fertilizer for rabbis in Khandesh
Demand for one lakh tonnes of fertilizer for rabbis in Khandesh

जळगाव  ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा खरिपातील मोठा साठा शिल्लक आहे. रब्बी हंगामदेखील अपेक्षेपेक्षा अधिक असू शकतो. यामुळे सुमारे सव्वालाख मेट्रिक टन विविध खतांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागातून मिळाली.

खरिपात सुरवातीपासून खतांची टंचाई, काळाबाजार, आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, असा प्रकार सुरू होता. पिकांची चांगली वाढ झाली. तरीदेखील युरिया, १०.२६.२६, दाणेदार सुपर फॉस्फेट आदी खतांची कमतरता होती. ग्रामीण भागात युरियाची, तर ३५० ते ४०० रुपये दरातही काही विक्रेत्यांनी विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक सर्वत्र झाली. खरीप हंगाम आता संपत आला आहे. रब्बी हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. रब्बीची पेरणी १०० टक्क्यांवर म्हणजेच २ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होऊ शकते. सर्वाधिक पेरणी कोरडवाहू हरभऱ्याची होईल. 

ही पेरणी सुमारे एक लाख हेक्टरपर्यंत होऊ  शकते. त्यापाठोपाठ मका, ज्वारी, बाजरी, गव्हाची पेरणी होईल. यात गहू, मका, ज्वारी व कांदेबाग केळीसाठी रासायनिक खतांची अधिक गरज असेल. जिल्ह्यात युरिया व १०.२६.२६ या खताची अधिक मागणी, उचल सुरू असते. नेमकी याच खतांची टंचाई ऐन हंगाम केली जाते. आता रब्बी हंगामात कांदेबाग केळीला सुरवातीलाच सुपर फॉस्फेटची बेसल डोसमध्ये योग्य मात्रा शेतकरी देतील.

जिल्ह्यात सध्या सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपीचा मुबलक साठा आहे. परंतु, इतर खतांचा साठा मुबलक नसल्याची माहिती आहे. त्यात युरिया, १०.२६.२६ चा साठा कमी आहे. या खतांचा पुरवठा लवकर करून घ्यावा लागणार आहे. काही सरळ व संयुक्त खतांचा मिळून सुमारे २१ हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.

सध्या केळी पिकांसाठी खतांची मागणी आहे. पुढे कांदेबाग केळीची लागवड सुरू होईल. त्या वेळेस खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घ्यावी लागतील. जिल्ह्यात सुमारे ५५ हजार मेट्रिक टन युरिया रब्बी हंगामात उपलब्ध होऊ शकतो. तर, फॉस्फेट, पोटॅश, डीएपी व १०.२६.२६ या खतांचादेखील चांगला पुरवठा होईल. पुढे सरळ खतांची मागणी कमी राहील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com