agriculture news in marathi demand for onion increases in solapur | Agrowon

सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव; दर तेजीत

सुदर्शन सुतार
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्यासह कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव राहिला. मागणी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरातील तेजी टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून  सांगण्यात आले. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्यासह कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव राहिला. मागणी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरातील तेजी टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून  सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक रोज ४० ते ५० गाड्या अशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने कांद्याला चांगला उठाव मिळतो आहे. गेल्या आठवड्यात त्यात किंचित सुधारणाही झाली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. कांद्याला १०० ते ४००० रुपये तर सरासरी १८०० रुपये क्विंटल दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत त्याचे दर २०० ते ४०० रुपयांच्या फरकाने वाढले. त्याशिवाय भाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव मिळाला.

भाज्यांची आवक प्रत्येकी रोज ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १००० ते १५०० रुपये आणि मेथीला ७०० ते १००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांगी, भेंडी, गवार यांनाही तसाच उठाव आणि दर मिळाला. या फळभाज्यांची आवक प्रत्येकी १० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. टोमॅटोला ३०० ते १६०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. वांग्यास १२०० ते ५००० रुपये तर सरासरी २२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीला ११०० ते ४००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल तर गवारीला १२०० ते ४२०० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

डाळिंबाचे दर स्थिर
डाळिंबाची आवक सध्या बाजारात कमीच आहे. पण मागणी वाढली आहे. डाळिंबाचे दर या सप्ताहात बऱ्यापैकी स्थिर राहिले. डाळिंबाची आवक प्रतिदिन अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. डाळिंबाला ४०० ते १३,००० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...