परभणीत लिंबू, वांग्याची मागणी वाढली

परभणीत लिंबू, वांग्याची मागणी वाढली
परभणीत लिंबू, वांग्याची मागणी वाढली

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्या, टोमॅटो, कारले, दोडके, काकडी, लिंबाच्या दरात सुधारणा झाली आहे. हिरवी मिरची, गवार, भेंडीचे दर स्थिर होते. लिंबू, वांग्याची मागणी वाढली आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून येणारी पालेभाज्या, दोडके, कारल्याची आवक कमी झाली आहे. सोमवारी (ता. २९) पालकाची ७ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विटंल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले. मेथीच्या २ हजार ५० जुड्याची आवक असताना प्रतिशेकडा ८०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.  कोथिंबिरीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. गेल्या आठवड्यात पालकाची सरासरी १५ क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटलचे दर ६०० ते १००० रुपये होते. मेथीची सरासरी ७ हजार जुड्या आवक होती. त्या वेळी प्रतिशेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. शेपूची २२ ते २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलचे दर ८०० ते १२०० रुपये होते. 

लग्नसराई असल्यामुळे वांग्याला मागणी वाढली आहे. सोमवारी (ता. २९) वांग्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मागणी वाढली असली तरी वांग्याची चांगली आवक असल्याने दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात टोमॅटोची सरासरी ५०० क्विंटलपर्यंत आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटलचे दर १५०० ते २००० रुपये होते. 

टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली असून सोमवारी (ता. २९) टोमॅटोची ३०० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल २२०० ते २६०० रुपये दर मिळाले.गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही गवार, भेंडीची सरासरी ८ ते १२ क्विंटल आवक होत आहे. प्रतिक्विंटलचे दर १२०० ते २००० रुपये होते. वाढलेल्या उन्हामुळे दोडके, कारले या वेलवर्गीय भाज्यांची आवक कमी झाली आहे. काकडीच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी काकडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.गेल्या आठवड्यात सरासरी १५ ते १८ क्विंटल आवक असताना काकडीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com