नगर जिल्ह्यात अनुकसानग्रस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधीची मागणी

Demand for Phase II aid for afflicted farmers in the Nagar district
Demand for Phase II aid for afflicted farmers in the Nagar district

नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी १२४ कोटी १९ लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना शुक्रवारी (ता.२९) पत्र पाठविण्यात आले. त्यामुळे लवकरात लवकर हा निधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. 

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून चार लाख ५४ हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख ३६ हजार १४६ आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांतर्फे शासनदरबारी दाखल झाला होता.

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून १३५ कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान नुकतेच जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यापैकी १२४ कोटी १९ लाखांचा निधी बॅंकेत वर्ग करण्यात आला. या मदतीचे वाटप तालुकास्तरावरून करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी जिल्ह्याने दुष्काळ सोसला. पशुधन जगविण्यासाठी ५०४ चाराछावण्या सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या टॅंकरच्या संख्येने ८७३ असा विक्रमी आकडा गाठला. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला शिवाराचे डोळे मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले होते. सुरुवातीची काही नक्षत्रे बरसल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र सप्टेंबरच्या अखेरीस चित्रा व स्वाती नक्षत्रांच्या सरींनी शिवारात बरसातीचा उत्सव मांडला. ९७ पैकी ९७ महसूल मंडळांत दमदार पाऊस झाला.

परतीच्या मॉन्सूनने यंदा ८०९.९९ मिलिमीटर बरसत मागील १८ वर्षांच्या सरासरीचा विक्रम मोडला. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात २०० मिलिमीटर असा उच्चांकी पाऊस झाला. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे; मात्र बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्‌ध्वस्त केले. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया केली. त्यानुसार राज्य शासनाला पाठविलेल्या ४७५ कोटींच्या अहवालानुसार, १३५ कोटी ५५ लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी १२४ कोटी बॅंकेत वर्ग झाले आहे. 

हेक्टरी आठ हजार रुपये

अपत्ती निवारणातून यापुर्वी अतिवृष्टी, वादळ, दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून हेक्टरी जिरायतीसाठी ६ हजार ८००, बागायतीसाठी १३ हजार पाचशे व फळपिकांसाठी १८ हजार रुपये दिले जात होते. यंदा राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार बागायती आणि जिरायतीसाठी ८ हजार रुपये हेक्टरी दिले जात आहेत. फळपिकांना १८ हजार रुपये दिले जात असून, त्यानुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेबाबत संभ्रम होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com