Agriculture news in marathi Demand for probe into soybean crop insurance scam | Agrowon

सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणात सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मिळालेला नाही.

अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणात सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मिळालेला नाही. या सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करून शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणी भारत कृषक समाजाने शासनाकडे केली आहे. या बाबत भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी निवेदन दिले.

जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर पीक पाहणी समितीने सगळीकडे घोळ केल्याच्या व प्रत्यक्षात शेतात न जाताच घरी बसून अहवाल तयार केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. एक महिन्यापासून याची चौकशी सुरू असून, ऐन हंगामाच्या वेळीच शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे.

 विमा कंपन्यांची मुजोरी कोणाच्या भरवशावर सुरू आहे. याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. कृषी व महसूल विभागाची भूमिका संशयास्पद आहे. करोडोंचा प्रीमीयम भरल्यावर व ५० टक्क्यांवर नुकसान झाले तरी सुद्धा विमा भेटत नसेल तर भविष्यात शेतकरी या योजनेपासून दूर जातील. तरी या प्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी उचित कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. मानकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विमा अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...