गडचिरोलीत मका खरेदीसाठी गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी

गडचिरोली ः हमीभावाने मका खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत गोदाम उपलब्ध करुन द्यावे,अशी मागणी चामोर्शी बाजार समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांनी केली आहे.
Demand for provision of warehouse for purchase of maize in Gadchiroli
Demand for provision of warehouse for purchase of maize in Gadchiroli

गडचिरोली ः हमीभावाने मका खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत गोदाम उपलब्ध करुन द्यावे,अशी मागणी चामोर्शी बाजार समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी त्यांनी केली आहे. निवेदनानुसार, आधारभू किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात रब्बी हंगामात मका खरेदी करण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनने घेतला आहे. शासकीय गोदाम उपलब्ध न झाल्याने अद्यापही मका खरेदी जिल्ह्यात कोठेही सुरू होऊ शकले नाही.

जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कुरखेडा, देसाईगंज व धानोरा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात मका लागवड क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना यावर्षी मक्‍याची चांगली उत्पादकताही झाली. परंतू लॉकडाऊनमुळे मका खरेदीसाठी व्यापारी उत्सूक नसल्याने विक्रीचा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा खरेदी तसेच शेती मशागतीचा खर्च भागविण्यासाठी पैशाची आवश्‍यकता आहे. मका विक्री केल्याशिवाय त्यांना पैसा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मका खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्याकरिता आधी शासकीय गोदामाची उपलब्धता करावी, अशी मागणी गण्यारपवार यांची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com