हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर रब्बी बियाण्यांची मागणी

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात १ लाख ८७ हजार ४०० हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी ६२ हजार ४३५ क्विंटल बियाण्याची आणि विविध ग्रेडच्या ६२ हजार ८३३ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली.
Demand for rabi seeds on 62,000 quintals in Hingoli district
Demand for rabi seeds on 62,000 quintals in Hingoli district

हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात १ लाख ८७ हजार ४०० हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी ६२ हजार ४३५ क्विंटल बियाण्याची आणि विविध ग्रेडच्या  ६२ हजार ८३३ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली.

यंदाच्या नियोजित पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी १२ हजार २२१ हेक्टर, गहू ४६ हजार ८४४ हेक्टर, हरभरा १ लाख २४ हजार ६५१ हेक्टर, करडई ४०८ हेक्टर, मका १ हजार १९३ हेक्टर, इतर तृणधान्यांचे ४६ क्विंटल, इतर कडधान्यांचे ३०७ हेक्टर, इतर गळीत धान्यांच्या १ हजार ३८७ हेक्टर क्षेत्राचा समावेश  आहे. त्यासाठी आवश्यक एकूण ६२ हजार ४३५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. त्यामध्ये महाबीजच्या ७ हजार १०० क्विंटल आणि खासगी कंपन्यांच्या ५५  हजार ३३५ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. 

ज्वारीचे ८७९ क्विंटल बियाणे, गव्हाचे २३  हजार ४२२ क्विंटल, हरभऱ्याचे ३७ हजार ३९५ क्विंटल, करडईचे ४०.८ क्विंटल, इतर तृणधान्याच्या  ४६.७ क्विंटल, इतर कडधान्यांचे ५५.३ क्विंटल, इतर गळीत धान्याच्या ४१६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. रब्बी कांद्याची ८५ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी ४.३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.

६२ हजार टन खताची मागणी 

यंदाच्या रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर ते मार्च एकूण ६२ हजार ८३३ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली. त्यात युरिया १७ हजार ६७ टन, सुपर फॉस्फेट ७ हजार टन, पोटॅश ६ हजार ११७ टन, डीएपी ११ हजार ७५७ टन, संयुक्त खते २० हजार ८९२ टन यांचा समावेश आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com