म्हैसाळचे पाणी ओढा पात्रात सोडण्याची मागणी

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी पोट कालवा व ओढा पात्रात सोडण्याची मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव, नरघोलवस्ती, मोरगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Demand for release of mhaisal water in a rift
Demand for release of mhaisal water in a rift

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी पोट कालवा व ओढा पात्रात सोडण्याची मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव, नरघोलवस्ती, मोरगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी म्हैसाळ योजना आहे. सुमारे एक महिना झाला या योजनेचे आवर्तन सुरू होईल. परंतु या भागात पोटकालव्याने पाणी आलेच नाही. त्यामुळे योजनेच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. सध्या तालुक्यातील या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. योजना सुरू असून पोट कालवा आणि ओढा पात्रात पाणी पाटबंधारे विभागाने सोडलेले नाही. सध्या पाणीपट्टी भरा तरच पाणी सोडतो असा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

म्हैसाळच्या कालव्यातून ओढा पात्रात सोडण्यात येणारे गेट व पोट कालव्यात व्हॉल्व्ह सध्या नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त होणे गरजेचे आहे. परंतु हा दुरुस्त केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पाणी पट्टीची आकारणी कमी करून तसेच यामध्ये राहिलेली रक्कम शासनाने भरावी व तालुक्यातील शेतीला पाणी द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. परंतु गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि पाणी टंचाई यामुळे पिकांचे आर्थिक मोठे नुकसान झाला आहे. त्यामुळे पाणी पट्टी भरण्याची तयारी नाही.

दरम्यान, नरसिहंगाव आमि नरघोल या गावातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी गोळा केली आहे. ते भरण्यास तयार आहेत. परंतु या संपूर्ण लाभ क्षेत्रातील पाणीपट्टी भरली तरच पाणी सोडले जाईल, असा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com