ज्वारी पिकासाठी पेनटाकळीचे पाणी सोडण्याची मागणी

बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात सध्या उभ्या असलेल्या ज्वारी पिकासाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकरी संतोष तोंडे यांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदन देत पीक वाचविण्यासाठी तातडीने पाण्याची मागणी केली आहे.
Demand for release of Pentacle water for sorghum crop
Demand for release of Pentacle water for sorghum crop

बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात सध्या उभ्या असलेल्या ज्वारी पिकासाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकरी संतोष तोंडे यांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदन देत पीक वाचविण्यासाठी तातडीने पाण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , मेहकर तालुक्यातील जानेफळ, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, उटी, गोमेधर, लोणी काळे, निंबा, मोसंबेवाडी, मिस्कीनवाडी, सावत्रा व परिसरातील शेतकरी ज्वारीचे पीक घेत आहेत. सध्या पिकाला पाण्याची नितांत आवश्‍यकता आहे. पाण्यासाठी शारंगधर उपसा व तुषार जलसिंचन सहकारी संस्थेचे अध्यक्ष शेतकरी संतोष तोंडे यांनी पेनटाकळी पाणी वापर शिखर महासंघाला गुरुवारी (ता. ७) निवेदन पाठवले आहे.

निवेदनामध्ये मागणी केली की, शिखर महासंघाने संबंधित विभागाकडे पैसा भरणा करून रब्बी हंगामासाठी चार पाणी दिले आहेत. आता मिळणारे पाणी हे उन्हाळी हंगामाचे आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु जानेफळ परिसरातील काही शेतकऱ्यांनी तिनशे एकर रब्बी ज्वारीचा पेरा केला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेले ज्वारीचे वाण दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. आता जर एक वेळा पाणी सोडल्या गेले नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ही मागणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे केलली आहे. यंदा पेनटाकळी प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुले तातडीने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com