बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी 

भंडारा ः उन्हाचा पारा वाढता असतानाच तुमसर तालुक्‍यातील ग्रामीण भागात पाणी समस्येने डोके वर काढले आहे. उन्हाळी पिके वाचविण्याचे आवाहन देखील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्याने तत्काळ बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकरिता राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. हा प्रकल्प बावनथडी नदीवर उभारण्यात आला आहे.
Demand for release of water from Bawanthadi project

त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारे पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जाते. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे तालुक्‍यातील देवनारा, चिखली, डोंगर बुज, रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी पाथरी, कवलेवाडा सकरघरा, घानोड, सोंडवा, वारपिंडकेपार, महालगाव या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 

पिण्याच्या पाण्यासोबतच हंगामी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे आव्हान आहे. तालुक्‍यात गेल्यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस परिणामी कोरडे पडलेले स्रोत परिणामी पाण्याचा प्रश्‍न अधिकच गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांकडील पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडले आहेत. बावनथडी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा आहे. त्या पाण्याचा नदीपात्रात निचरा झाल्यास जलस्तर वाढून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी देखील याप्रश्‍नी प्रशासनाने लक्ष्य देत पिके वाचविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com